आपचे भाजपला आव्हान 

0
162
गोवा खबर : २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, झुमला जाहीर केल्याबद्दल आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षाला फटकारले आहे. राज्याचे संयोजक राहुल म्हंबरे म्हणाले की, नोकरी असो की कल्याणकारी योजना असोत, मुख्यमंत्र्यांनी प्रमोद सावंत यांनी केवळ दिशाभूल करण्याच्या पोकळ घोषणा केल्या आहेत.
१० हजार नोकऱ्यांच्या आश्वासनावर म्हांबरे म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यापासून सावंत यांनी प्रत्येक निवडणुकीपूर्वी हे वचन दिले होते, पण प्रत्येक वेळी ते एक झुमला ठरले.
“गेल्या दहा वर्षांच्या भाजपाच्या राजवटीत काहीच दाखविण्यासारखे नाही, म्हणून लोकांमध्ये सत्ता विरोधी आक्रोश पाहून भाजपा चिंतेत पडले आहे. ते हताश आहेत आणि निवडणुकांपूर्वी संभाव्य उमेदवारांच्या स्वाधीन करण्यासाठी बनावट आश्वासनांचे पत्रक सुपुर्त करतील, परंतु निवडणुकांनंतर जे पत्रक ते छापले जाईल, त्यात दिलेल्या आश्‍वासनांपैकी काही नसेल. १० हजार विसरा, मी भाजप सरकारला आव्हान केले आहे की, डिसेंबरपर्यंत फक्त १ हजार सरकारी नोकऱ्या देऊन दाखवा ”, म्हांबरे यांनी भाजपला आव्हान केले.
म्हांब्रे यांनी लाडली लक्ष्मी योजनेचा मुद्दा उपस्थित केला आणि असे म्हटले की, हजारो अर्जांना मंजुरी देण्यास उशीर करून स्व. मनोहर पर्रीकर यांचा वारसा नष्ट केल्याचे आपने उघडकीस आणताच, सावंत सरकारने कार्यवाही सुरु केली.
“तथापि, भाजपा ही योजना झुमला म्हणून वापरत आहे. भाजपाचे आमदार महिलांना त्यांच्या पक्ष कार्यालयात लाडली लक्ष्मी योजनेसाठी “मंजुरी पत्र” देण्यास सांगत आहेत, पण लाभार्थ्यांना हा निधी कधी मिळणार याची स्पष्टता नाही. वर्षानुवर्षे अर्ज प्रलंबित ठेवल्यानंतर आतापर्यंत केवळ १० टक्के अर्ज मंजूर झाले आहेत, तेही आपने नंतर हा मुद्दा उपस्थित केल्यावर, म्हांबरे म्हणाले.
पेट्रोल ते वीजेपर्यंतच्या सर्वच भाडेवाढीमधून सर्वसामान्यांवर ओझे वाढविताना आणि विविध फी, कर आणि शुल्काच्या वाढीसह छोट्या उद्योगांवर बोजा पडत असताना भाजपा सरकारने प्रत्येक वचनानुसार जनतेची फसवणूक केल्याचे म्हांबरे म्हणाले.
“२०१२ मध्ये ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जासह भाजपा सत्तेत आली आणि आज २० हजार कोटींना कर्जाचा स्पर्श झाला आहे.आमच्या नावावर भाजपा सरकारने फक्त कर्ज घेतले नाही, तर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे गोव्यातील बेरोजगारी सर्वाधिक वाढवली, तर राज्याची अर्थव्यवस्था खालच्या पातळीवर गेली आहे. ”, म्हांबरे यांनी आरोप केला.