आपचे आमदार राघव चढ्ढा गोव्यात दाखल

0
450
पत्रकार परिषद घेणार,ट्विटद्वारे दिली माहिती

 

गोवा खबर:आपचे नेते आणि दिल्लीचे आमदार राघव चड्ढा शुक्रवारी गोव्यात दाखल झाले असून उद्या सकाळी पणजीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्वीट करतानाच त्यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या राजकारणावर भाष्य करताना राजकारणाच्या शुद्धिकरणासाठी लोक पुढे येत असल्याचे म्हटले आहे.

 आमदार चढ्ढा यांनी ट्वीट करून काँग्रेसच्या आमदारांनी भाजपाला पाठिंबा दर्शविल्याचे नमूद करतानाच या राजकारणावर “गोयंकर संतप्त आहेत, त्यांचा विश्वासघात केला आहे याकडे लक्ष अधोरेखित करताना गोव्याचे राजकारण स्वच्छ करण्याची हीच वेळ आहे,असे सांगितले आहे.
आपच्या गोव्यातील बऱ्याच प्रमुख नेत्यांनी राघव यांचे ट्विट पुन्हा ट्विट केले आणि ते म्हणाले की गोव्याचे राजकारण साफ करण्याची वेळ आली आहे.

राघव चड्ढा हे गोव्यातील राजकारणाला हादरवून टाकेल अशा घटनेची आठवण करून देण्यारी मोहीम राबवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
“दोन वर्षांचा विश्वासघात,काँग्रेसच्या 70 टक्के नेत्यांनी गोयंकरांसोबत विश्वासघात केला, गोव्याचे राजकारण स्वच्छ करण्याची वेळ आली आहे”, असे राहुल म्हांबरे म्हणाले.