आपची निलेश काब्राल यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने

0
222
गोवा खबर : आम आदमी पार्टीने आज मंत्री निलेश काब्राल यांच्या हुकूमशाही वागणुकीचा निषेध करत निदर्शने केली आणि सभपतींविरोधात मांडलेला अविश्वास ठराव त्वरित मागे घेण्याची मागणी केली.
आप कुडतरी काकोराचे अध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,नुकत्याच झालेल्या निवडणुका म्हणजे जनतेचा विजय आणि निलेशचा पराभव होय.
त्यांनी निदर्शनास आणून दिले की,५ नगरसेवकांना बिनविरोध निवडून आणण्याच्या निलेश यांच्या दाव्याला परिसरातील लोकांनी परिषदेच्या सर्व प्रभागात उमेदवार उभे करून हानून पाडले.
बालकृष्ण होदरकर यांची सभापतीपदी निवड झाल्याने हे सिद्ध होते की, निलेश यांनी परिषदेवरील नियंत्रण गमावले आहे.
ते म्हणाले की, “निवडून आलेल्या नगरसेवकांना सभापती निवडून देण्याचा हक्क आहे,परंतु त्यांना सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी निलेशने धमकावले आहे,” ते म्हणाले.
निलेश यांना नवीन नगरसेवकांना हुकूमशाही पद्धतीने मार्गदर्शन न करण्याचा सल्ला देताना ते म्हणाले की,लोकांच्या शांततेला गृहीत धरले जाऊ नये.
सभापतींविरोधातील अविश्वास ठराव त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबद्दल निलेश काळजीत आहेत आणि म्हणून ते असे वागत आहेत, असे क्रिस्तानंद पेडणेकर म्हणाले.