आधुनिक काळातील उत्कृष्ठ नेता हरपला; उपराष्ट्रपतींनी वाहिली पर्रिकर यांना श्रद्धांजली

0
868
गोवा खबर:उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आदरांजली वाहिली.नायडू 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले असून आज सकाळी त्यांनी पर्रिकर यांच्या दोनापावल येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

पर्रिकर यांना आदरांजली वाहून झाल्या नंतर नायडू यांनी पर्रिकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.पर्रिकर कुटुंबियांच्या भेटी नंतर फेसबुक आणि ट्विटर वर आपल्या भावना व्यक्त करताना नायडू म्हणाले,
मनोहर पर्रिकर यांच्या सोबत माझा 30 वर्षांहून अधिक काळ  सहवास होता. ते आधुनिक काळातील उत्कृष्ट नेत्यांपैकी एक होते.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे देशाचे आणि खासकरून गोव्याचे  मोठे नुकसान झाले आहे.
मनोहर पर्रिकर यांना त्यांच्या आदर्शांचे आचरण करून आणि सार्वजनिक सेवेमध्ये त्याने दिलेले मार्ग पाळून खरी श्रद्धांजली देण्याची गरज आहे,असे मत उपराष्ट्रपती नायडू यांनी व्यक्त केले आहे.