आधार कार्ड ओळखपत्र पुरावा म्हणून वापरावा

0
943

गोवाखबर:भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या यादीतील कलम सातनूसार  “कारागृह व्यवस्था”  राज्य सरकारांच्या अखत्यारीतील विषय आहे. कारागृह प्रशासन  व्यवस्थापन ही राज्य सरकारची  जबाबदारी आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाना सूचना  केल्या असून, त्यानुसार कारागृहात कैद्यांना भेटायला येणाऱ्या लोकांचे ओळखपत्र पुरावा म्हणून आधार कार्ड मागितले जावे, असे सांगण्यात आले आहे.कैद्यांना भेटण्याची सुविधा योग्य व्यक्तींनाच मिळत आहे, याची खातरजमा करण्यासाठी हे आधारपत्र मागितले जावे. कैदयांचे आधारपत्र देखील वेळोवेळी तपासले जावे जेणेकरुन कैद्यांना न्यायालयात हजार करणे, इतर ठिकाणी ने-आण, आरोग्य तपासणी, वाहतूक, वकिलांची सुविधा, दीर्घ रजा, शैक्षणिक सुविधा,तुरुंगातून सुटका अशा सर्व वेळी आधार क्रमांक तपासला जावा. ओळखपत्र पुराव्यानेच कैद्यांची शहानिशा करूनच हे सगळे व्यवहार केले जावेत असे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज लोकसभेत  एका प्रश्नाला देतांना सांगितले.