आदिवासींच्या जीवनपद्धती माझ्या मनाला भावली आणि तीच या चित्रपटाची प्रेरणा आहे-‘केनजीरा’ चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज काना

0
726

चित्रपट हे ग्राहक उत्पादन नव्हे तर एक सर्जनशील कला आहे-चित्रपट दिग्दर्शक अनंत महादेवन

 

 

 

गोवा खबर:चित्रपट हे ग्राहक उत्पादन नव्हे तर एक सर्जनशील कला आहे असे चित्रपट दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले. कमी बजेटच्या चित्रपटांच्या तुलनेत मोठे बजेट असलेल्या चित्रपटांना प्राधान्य दिले जाते कारण त्यातील लोकप्रिय अभिनेत्यांमुळे चित्रपट अधिक कमाई करतात याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. कमी बजेट असलेल्या चित्रपटांचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. मात्र वितरक आणि चित्रपट प्रदर्शित करणारे उत्सुक नसतात. आम्ही महोत्सवाचा मार्ग निवडतो, मात्र जेव्हा आम्हाला आमचा चित्रपट विकायचा असतो तेव्हा तो व्यावसायिक चित्रपट आहे हे आम्हाला सिद्घ करावे लागते असे महादेवन म्हणाले.

 

ते आज गोव्यातील पणजी येथे इफ्फी महोत्सवात ‘माई घाट’ चित्रपटासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सुहासिनी मुळ्ये आणि उषा जाधव या अभिनेत्री तसेच सिनेमॅटोग्राफर अल्फोन्स रॉय हे देखील यावेळी उपस्थित होते. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या आईची कथा या चित्रपटात आहे. यात तिच्या मुलाला अयोग्य पद्धतीने चोरीच्या गुन्ह्यात अडकवले जाते आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या अत्याचारात त्याचा मृत्यू होतो.

या चित्रपटाबद्दल बोलताना सुहासिनी मुळ्ये म्हणाल्या की आपल्याला अतिशय वेगाने काम करायची सवय असते. मात्र या चित्रपटाचा वेग संतुलित असून या चित्रपटातील प्रमुख पात्र 13 वर्षे न्याय मिळवण्यासाठी लढा देत आहे, हे आपल्याला जाणवते. अनंतने शांततेचा खूप सुंदर वापर केला आहे असे त्या म्हणाल्या.

या चित्रपटाबाबत अनंत म्हणाले की, चित्रपट जागतिक सिनेमॅटिक भाषेत संवाद साधतो आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे हा सन्मान आहे. निर्मात्या मोहिनी गुप्ता यांनी सुरुवातीपासून खूप विश्वास दाखवला आणि मी त्यांना निराश करू शकत नव्हतो.

‘केनजिरा’ चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज काना म्हणाले, ‘मी मल्याळम रंगभूमीवरचा आहे. मी आदिवासींबरोबर खूप काम केले आहे आणि त्यांच्या जीवन जगण्याची पद्धत माझ्या मनाला भावली. ‘केनजिरा’ चित्रपटातील सर्व कलाकार आदिवासी आहेत. चामिलम आणि अमीबा नंतर हा माझा तिसरा चित्रपट आहे’ या चित्रपटासाठी पैसा उभा करताना आलेल्या अडचणी त्यांनी सांगितल्या. चित्रपटात एक बंद पडलेली शाळा विद्यार्थ्यांना नाटकाद्वारे आकर्षित करून पुन्हा सुरू केली जाते, असे कथानक आहे.