आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हानात सहभागी व्हा :पंतप्रधान

0
363

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान समुदायाला आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

लिंक्डइनवर प्रकाशित झालेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी भारतातील उत्साहवर्धक तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप वातावरण आणि विविध क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित उपाय म्हणून तरुणांनी कशी उत्कृष्ट कामगिरी केली याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, स्वदेशी अ‍ॅप्सचा शोध लावून त्याचा विकास आणि जाहिरात करण्यासाठी स्टार्ट-अप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप उत्साह आहे.  राष्ट्र आत्मनिर्भर भारत निर्मितीच्या दिशेने वाटचाल करीत असताना, स्थानिक बाजारपेठांबरोबरच जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील असे अ‍ॅप्स विकसित करण्यासाठी त्यास दिशा आणि गती देण्याची ही चांगली संधी आहे असेही पंतप्रधान म्हणाले.

हे उद्दीष्ट लक्षात ठेवून, अटल नवोन्मेष अभियानासह इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हान घेऊन आले आहे जे सध्याच्या अ‍ॅप्सची जाहिरात करणे आणि नवीन अ‍ॅप्सचा विकास करणे या दोन मार्गांवर कार्यरत आहे. हे आव्हान अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी सरकार आणि तंत्रज्ञानाच्या सदस्यांद्वारे संयुक्तपणे त्याची कार्यवाही होईल.

ई-लर्निंग, वर्क-फ्रॉम-होम, गेमिंग, व्यवसाय, करमणूक, कार्यालयीन सुविधा आणि सोशल नेटवर्किंग या विभागांमध्ये अस्तित्त्वात असलेली अ‍ॅप्स आणि व्यासपीठाना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मार्गदर्शन, सहकार्य आणि समर्थन प्रदान करेल. आघाडीच्या फळीतील दर्जेदार अ‍ॅप्स ओळखण्यासाठी पहिला मार्ग मिशन मोडमध्ये कार्य करेल आणि सुमारे एक महिन्यात काम पूर्ण करेल. नवीन अ‍ॅप्स आणि व्यासपीठे विकसित करण्यासाठी, त्याच्या प्रतिकृती तयार करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा उपयोग करण्यात येईल.

पंतप्रधानांनी लिहिले आहे कि या आव्हानाचा परिणाम म्हणजे विद्यमान अ‍ॅप्सना त्यांचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी अधिक चांगली दृश्यमानता आणि स्पष्टता देणे आणि संपूर्ण आयुष्यामध्ये मार्गदर्शक, तंत्रज्ञानाचे समर्थन आणि प्रशिक्षण यांच्या सहाय्याने तंत्रज्ञान विषयक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उत्पादने तयार करणे.

पंतप्रधानांनी कल्पना सामायिक केल्या आणि विचारणा केली की पारंपारिक भारतीय खेळ अधिक लोकप्रिय करण्यास तंत्रज्ञान मदत करू शकेल का?, लोकांचे पुनर्वसन किंवा समुपदेशन करण्यात मदत करण्यासाठी अॅप्स विकसित करता येऊ शकतात का किंवा शिकण्यासाठी, गेमिंग इत्यादींसाठी योग्य वयोगटातील लक्ष्यित आणि स्मार्ट प्रवेशासह अ‍ॅप्स विकसित होऊ शकतात का?  तंत्रज्ञान समुदायाने सहभाग घेऊन आत्मनिर्भर अ‍ॅप वातावरण तयार करण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.