आजाराचा बाजार धोरणामुळेच डीडीएसएसवायखाली कोविड उपचार निर्णय रद्द : काँग्रेस

0
266

गोवा खबर :  कोविड आजाराचा उपचार डिडीएसएसवायच्या खाली आणण्याचा सरकारी निर्णय भाजप सरकारने रद्द केला. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या मध्ये कमिशनचा वाटा ठरवताना एकमत न झाल्यानेच हा निर्णय सरकारने घेतला आहे. आजाराचा बाजार करण्याचे भाजपचे धोरण आजही सरकारने चालुच ठेवले असुन, परमेश्वराने लोकांना चांगले आरोग्य द्यावे व कोविड आजारापासुन दूर ठेवावे अशी आम्ही प्रार्थना करतो अशी टिका काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री  प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह मंत्रीमडळातील सर्व मंत्री व भाजपचे पदाधिकारी कोविड महामारी काळात केवळ सरकारी तिजोरी लुटण्यात व्यस्त आहेत हा काॅंग्रेस पक्षाचा आरोप आजच्या निर्णयाने परत एकदा खरा ठरला आहे. भाजप सरकारला लोकांच्या आरोग्याचे काहीच पडलेले नाही हे स्पष्ट झाले आहे, असे पणजीकर म्हणाले.
कोविड महामारीचे गोव्यात रुग्ण सापडल्यानंतर चाचणी केंद्र सुरू करणे, वैद्यकीय उपकरणे व व्हेंटीलेटर खरेदी या सर्वांसाठी मागील सात महिन्यात जो विलंब झाला तो मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या कमिशन वाटून घेण्यात एकमत नसल्यामुळेच आहे,हा आरोप आम्ही परत एकदा करतो असे पणजीकर यांनी म्हटले आहे.