आजगांवकर यांच्याहस्ते पेडणे येथे विकास कामांचा शुभारंभ

0
207

                     

                                       

गोवा खबर: उपमुख्यमंत्री  मनोहर आजगांवकर यांनी २.३० कोटी रूपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ केला. धारगळ येथील तिवाडा येथ ४.५७ कि.मिटर लांबीच्या रस्त्यांची तसेच कासारवर्णे येथील ४.३५ कि. मि. लांबीच्या रस्त्याचे व त्याचप्रमाणे गोठाणवाडा ओझरी येथील २.७० कि. मि. लांबीच्या रस्त्याची सुधारणा आणि हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यात येईल. पेडणे येथील बागायतन येथे संरक्षक भिंत उभारणे याचाही या कामात समावेश आहे.

      यावेळी लोकांसमोर बोलताना  आजगांवकर यांनी योग्य रस्ता नेटवर्क मजबूत करणे हा विकासाचा एक भाग आहे असे सांगितले. सुरळीत आणि सुरक्षित वाहतूकीच्या उद्देशाने सरकारने रस्त्यांची सुधारणा आणि हॉटमिक्सिंगचे काम हाती घेतल्याचे ते म्हणाले.

   आजगांवकर यांनी सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे सांगितले. कोविड-१९ विषाणू विरूध्द आपण लढा दिला पाहिजे त्यासाठी लोकांनी सहकार्य देण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांनी लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचे तसेच फेस मास्क वापरणे आणि योग्य स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला.

      पुढे बोलताना  आजगांवकर यांनी जगात सर्वत्र पसरलेल्या कोविड-१९ या विषाणूमुळे आपण युध्दासारखे जीवन जगत असल्याचे सांगितले. या परिस्थितीतून आपण सुरक्षित बाहेर आलो पाहिजे. प्रत्येक वेळी प्रतिबंधात्मक उपाय हाती घेऊन  या महाभयंकर विषाणूपासून स्वताचे रक्षण केले पाहिजे असेही ते म्हणाले.

      पेडणे येथे भेटीच्यावेळी आजगांवकर यांच्या समवेत पेडणेच्या नगराध्यक्षा श्रीमती श्वेता कांबळी, उपनगराध्यक्ष श्री गजानन सावळ देसाई, नगरसेवक  उषा नागवेंकर,  सिध्देश पेडणेकर आणि इतर उपस्थित होते. तिवाडा धारगळ येथे सरपंचा सोनाली साळगांवकर, पंच सदस्य  भूषण नाईक,  सुभाष धारगळकर,  गोरखनाथ नाईक,  दाजी शिरोडकर व इतर आणि गोठानवाडा ओझरी येथे सरपंचा  स्मीता कळंगुटकर, उपसरपंच  सुरेश परब,  सुदाम परब तर कासारवर्णे येथे सरपंच  पांडुरंग पार्सेकर, उपसरपंच  शाम नाईक, पंच सदस्य  रमेश पालेकर आणि इतर मंत्र्यांसोबत होते.