आग्वाद सॅण्ड बार पट्ट्यातून वाहतूक करण्यास परवानगी

0
206

 गोवा खबर:आग्वाद सॅण्ड बार पट्ट्यातून वाहतूक करण्यासाठी अर्ज केलेल्या जहाज आणि बार्जेसना २१ ते २६ मे २०२० पर्यंत फक्त दुपारच्या वेळी त्यांच्या स्वताच्या जबाबदारीवर वाहतूक करण्यास परवानगी देण्यास खात्याची हरकत नसेल परंतु आग्वाद सॅण्ड बार पट्ट्यातून जाणा-या जहाज, बार्जेस आणि यांच्याकडे ग्राह्य सर्वेक्षण प्रमाणपत्र, ग्राह्य इन्शुरन्स असले पाहिजे असे बंदर कप्तान खात्याने कळविले आहे.

आग्वाद सॅण्ड बार पट्ट्यातून वाहतूक करणा-या जहाज आणि बार्जेसना त्यांच्या वजन क्षमतेनुसार २/३ वजन नेण्यास मिळेल. एक्सटेन्शन सर्वे सर्टिफिकेट असलेल्या बार्जेसना तपासणी, केल्याशिवाय आग्वाद सॅण्ड बार पट्ट्यातून वाहतूक करण्यास परवानगी नसेल.

मांडवी आणि जुवारी नदीतील बोय काडल्या आहेत आणि त्यासाठी नीविकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे ओव्हरटेक करण्यास बंदी असेल. बोटीनी फेरीबोटीपासून सुरक्षित अंतरावरून वाहतूक करावी. बार्जेसना दिलेली परवानगी कोणतेही कारण न देता मागे घेण्याचा अधिकार खात्याला असेल.