आगशीच्या वेशिवर आंतानिओने उभारली शेकडो स्टारची कमान

0
1278
 गोवा खबर:पणजी- मडगाव मार्गावर कुठ्ठाळी पूर्वी आगशी नावाचा गाव लागतो.या गावाच्या वेशिवरच आंतानिओ आगासाय यांनी स्वतः दिवस रात्र राबुन शेकडो स्टारची कमान बनवली आहे.या स्टार मुळे सध्या या गावाच्या वेशिवर तारे जमी परचे दृश्य बघायला मिळत आहे.
आंतानिओ यांना पारंपरिक पद्धतीने बनवल्या जात असलेल्या स्टारची परंपरा कायम राखायची आहे.त्यासाठी त्यांना पारंपरिक स्टार नवीन पीढीच्या नजरे समोर ठेवायचे होते.
15 सेप्टेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत दिवस दिवसभर एका जागी बसून त्यांनी बांबूच्या काठया आणि पांढऱ्या,निळया फोली वापरून हे आकाश कंदील साकरले आहेत.त्यांचा उपक्रम बघून अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत.20 डिसेंबर पासून त्यांनी या स्टार पासून बनवलेली कमान आणि गोठा झळाळून गेला आहे.आंतानिओ यांच्या मित्राने तर जो कोणी नेमके किती स्टार वापरले हे सांगेल त्याच्यासाठी 11 हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केले आहे.आज रात्री ख्रिसमसची डान्स पार्टी या ठिकाणी रंगणार असून 31 डिसेंबर पर्यंत सेलिब्रेश चालणार आहे.
.