आकाश अंबानीने श्लोकाला गोव्यात खास अंदाजात केले प्रपोज

0
1214

गोवा : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाने आपली प्रेमिका श्लोका मेहता हिला काल उत्तर गोव्यातील आग्वाद किल्ल्या शेजारी समुद्र किनाऱ्याच्या शेजारी असलेल्या ताज व्हिलेज मध्ये अनोख्या ढंगात प्रपोज केले. आपल्या मोठ्या चिरंजीवाचा हा सोहळा यादगार व्हावा यासाठी मुकेश अंबानी यांनी कोणतीच कसर पडू दिली नाही.
अंबानी कुटुंबासाठी कालचा दिवस खास होता.मुकेश अंबानी यांनी आपल्या मोठ्या मुलाच्या प्रपोज सोहळ्यासाठी खास त्यांच्या पसंतीच्या गोव्याची निवड केली होती.मुकेश अंबानी यांचे गोव्याशी वेगळे नाते देखील आहे.उद्यगपती साळगावकर हे त्यांचे नातेवाईक लागतात,आणि गोव्याच्या वातावरणात जी एनर्जी आहे ती बाकी ठिकाणी अनुभवता येत नसल्याने या खास सोहळ्यासाठी अंबानी यांनी गोव्याची निवड केली असावी असे मानले जाते.
दुपारी साडे तीन वाजता आकाश आणि श्लोका दाबोळी विमानतळावर लॅंड झाली.तेथून त्यांना फोर्ट आग्वाद हेलीपॅडवर आणण्यासाठी खास चॉपरची तैनाती करण्यात आली होती.आकाश आणि श्लोकाला प्रायव्हसी मिळावी अशी व्यवस्था करण्यात आली होती.सगळ्यात पहिल्यांदा आकाश आणि श्लोका यांचे आगमन झाले.3 वाजून 50 मिनीटांनी दोघे आग्वाद हेलीपॅडवर उतरले.आकाश हा थ्री फोर्थ पँट आणि सध्या शर्टवर सगळ्यात पहिल्यांदा खाली उतरला.श्लोकाने देखील लाल रंगाचा पायजमा आणि मरून कलरचा टॉप घातला होता.दोघांचे स्वागत झाल्या नंतर त्यांच्या साठी तैनात असलेल्या आलीशान कार मधून त्यांनी 3 किलो मिटरवर असलेले ताज व्हिलेज हॉटेल गाठले.
ताज आग्वाद आणि ताज व्हिलेजच्या मध्ये जीवा स्पा आहे.त्यांच्या समुद्राकडील बाजूला फलांनी खास सजावट करून फोटो सेशन साठी खास व्यवस्था करण्यात आली होती.आकाश आणि श्लोका हॉटेल मध्ये पोचल्या नंतर त्यांनी कपडे चेंज करून फोटो सेशनसाठी वेळ दिला. सूर्यास्ताचा मुहूर्त धरून हे फोटो सेशन करण्यात आले.आकाश यावेळी खुपच रोमांटिक मुड मध्ये दिसत होता.एक विदेशी फोटोग्राफर फोटो सेशनसाठी तैनात करण्यात आला होता.आग्वाद किल्ल्याचा समुद्राने वेढलेला बुरुज,सूर्यास्ता वेळी रंगीले झालेले आकाश,लाटांवर स्वार होऊन येणारा बेभान वारा अशा वातावरणात आकाशने श्लोकाला प्रपोज केले.
आकाश आणि श्लोका रोमांटिक वातावरणात असताना सायंकाळी 5 नंतर मुकेश अंबानी आई, पत्नी,मुलगी आणि इतर नातेवाईकां सोबत दाबोळी विमानतळावरुन खास चॉपरने आग्वाद हेलीपॅडवर पोचले. त्यांचे हेलीपॅडवरच वेलकम ड्रिंक देऊन स्वागत करण्यात आले.ताज आणि रिलायन्सचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.जवळपास 12 जण मुकेश अंबानी यांच्या सोबत आलीशान कार मधून ताज व्हिलेज मध्ये पोचताच सेलिब्रेशनला सुरुवात झाली.4 चॉपर मधून 50 च्या आसपास अंबानी कुटुंबिय या विशेष सोहळ्यासाठी हजेरी लावली होती.
सगळी पाहुणे मंडळी आल्यानंतर ताज व्हिलेजच्या किनाऱ्याच्या बाजूला खास तयार केलेल्या व्यासपीठावर बॉलीवुडच्या गाण्यावर सगळे अंबानी कुटुंबीय थिरकले. मुकेश अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन देखील मागे नव्हत्या.साधारण तासभर मस्ती भऱ्या वातावरणाचा सगळ्यांनी आनंद लूटल्या नंतर 8 वाजुन 10 मिनीटांनी आग्वाद किनाऱ्यावर सलग 15 मिनिटांची फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.डोळे दीपवून टाकणारी ही आतषबाजी होती.ही आतषबाजी झाल्या नंतर 9 च्या सुमारास बाय बाय करत अंबानी कुटुंबियांनी गोव्याचा निरोप घेत मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. साधारण 6 तास चाललेल्या सोहळ्याची चाहुल मीडियाला कानोकानी नव्हती.आकाशच्या प्रपोज सोहळ्यामुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेत आले.आता वेडिंग डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्यातच आकाश विवाह सोहळा करणार का,याची उत्सुकता सगळ्याना लागून राहिली आहे.