आंशिक लॉकडाउनच्या निर्णयाचे स्वागत परंतु, रुग्णालयात बेड आणि कोविड संबंधित सुविधा वाढविणे ही काळाची गरज : राहुल म्हांबरे

0
57
गोवा खबर : आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांनी पुढील चार दिवसांसाठी  आंशिक लॉकडाऊनच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.  मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घेण्यासाठी उशीर जरी झाला असला तरी, यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार कमी होईल.  या लॉकडाऊन कालावधी दरम्यान मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, अतिरिक्त बेड सुविधा तयार करणे आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे व आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा  योग्य तो आढावा घेतला जाणे आवश्यक आहे.
“मुख्यमंत्र्यांनी लोकांना एकत्रित जमायला  आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन केले आहे, तरी मुख्यमंत्री आणि मंत्री / आमदार यांना याबाबत स्वतः त्याचे काटेकोरपणे पालन करून स्वतः जनतेसमोर एक उदाहरण ठेवावे, अशी अपेक्षा आहे.सांखळी येथील पुलाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज लोकांच्या जमावाचे नेतृत्व केले, हे  मात्र अत्यंत आश्चर्यकारक आहे.  सद्याच्या कोरोनाच्या संकटकाळात एकीकडे सामान्य जनता होरपळत असताना व शोकात बुडालेली असताना मुख्यमंत्री मात्र प्रकल्पांचे उद्घाटन करण्याच्या मनःस्थितीत आहे, हे अतिशय लाजिरवाणे आहे.  आणि यावरून हे स्पष्ट होते की, हे भाजपा सरकार किती असंवेदनशील आहे.” असे राहुल म्हांबरे म्हणाले.
एकीकडे  पंतप्रधान “टीका उत्सव” बद्दल बोलताता नि दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री सावंत “कोरोना उत्सवाचे” आयोजन करत आहेत, असे म्हांबरे म्हणाले.
उशीरा का होईना पण मुख्यमंत्री आता असे म्हणत आहेत की, लोकांनी व विरोधी पक्षांनी सरकारवर फक्त टिकाकरण्याऐवजी सरकारला चांगल्या सूचना सुद्धा दिल्या पाहिजेत. तर आम्हाला मुख्यमंत्र्यांना हे स्मरण करून द्यायचे आहे की, आप पार्टीने मुख्यमंत्र्यांना या संकटाला तोंड देण्याबाबत सूचना देत आधीच दिलेल्या आहेत. मग ते घरगुती विलगीकरणाचे उपाय असोत किंवा ऑक्सिमीटर पुरवले जावे याबाबत असो. आपने चर्चेसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.  परंतु एक खेद आहे की, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारच्या मनात गोव्यातील लोकांबाबत चिंता नव्हती तर कॅसिनो आणि नाईट क्लबची चिंता होती. आम्ही पुन्हा मुख्यमंत्री सावंत यांना आप ने सुचवलेली 5T रणनीती लागू करण्याची आठवण करुन देत आहोत.
“गोवासारख्या छोट्या राज्यात जगातील छोट्या-छोट्या शंभर देशांपेक्षाही मृतांचा आकडा जास्त आहे, हे मुख्यमंत्री सावंत यांनी लक्षात घेतले पाहिजे.  सद्यस्थितीत भाजप सरकारने गोव्याला सोमालियापेक्षा वाईट बनविलेले आहे.” राहुल म्हांबरे म्हणाले.