आंबोली दुर्घटनेतील एकाचा मृतदेह मिळाला

0
1081

आंबोली घाटाजवळच्या कावळेसाद पॉइंट येथे चार दिवसांपूर्वी दरीत पडलेल्या दोन तरुणांपैकी प्रताप उजगरे राठोड याचा मृतदेह शुक्रवारी बाहेर काढण्यात आला. दुसऱ्या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही. गडहिंग्लज येथील सात जण सोमवारी वर्षा पर्यटनासाठी आले होते. त्यातील मद्यधुंद अवस्थेतील दोन तरुण दरीत कोसळले होते.

दाट धुके आणि पावसामुळे या मृतदेहांच्या शोधकार्यात अडथळे येत होते. कोल्हापूर येथील हिल रायडर्सचे तरुण या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी दरीत उतरले. तसेच सावंतवाडी तालुक्यातील सांगेलीच्या बाबल आल्मेडा यांची टीमही शोधकार्य करीत आहे. शुक्रवारी दुपारी प्रताप उजगरे राठोड (हिंगणी ता. धारूर जि. बीड) याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. त्याचा मृतदेह नातेवाईकांनी मूळ गावी नेला.