आंत्रप्रिन्युर्स ऑर्गनायझेशन (ईओ)ची शाखा गोव्यात सुरू

0
1772
भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये २२ चॅप्टरच्या जाळ्यासह ईओ-दक्षिण अशिया वेगाने वाढणारे जाळे
गोवा खबर : जगातिक सर्वांत मोठे पिअर-टु-पिअर व्यावसायिकांचे जाळे असलेल्या आंत्रप्रिन्युर्स ऑर्गनायझेशन (ईओ)ने ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात ईओ-गोवा चॅप्टरचे उद्घाटन झाल्याची घोषणा आज केली.
दक्षिण अशिया विभागातील ईओ जाळ्यामध्ये गोव्याचा २२वा चॅप्टर म्हणून नव्याने समावेश करण्यात आला आहे. ईओ गोवाच्या माध्यमातून औषध निर्मिती, उत्पादन, अन्न आणि पेय उत्पादने, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, शिक्षण आणि प्रशिक्षण, रिअल इस्टेट आदी क्षेत्रांतील उद्योजकांना एका व्यासपीठावर येऊन आपले व्यवसाय जाळे विस्तारित करण्यास संधी मिळणार आहे. आपले समूहजाळ्यामध्ये अधिकाधिक उद्योजक, व्यावसायिकांना सामावून घेण्याबाबतचे आगामी पाच वर्षांचे विस्तार धोरण या चॅप्टरद्वारे आखले जात आहे.
ईओ-गोवा चॅप्टरच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मिलिंद देवरा (माजी खासदार व केंद्रीय मंत्री), श्री. राहुल शर्मा (सहसंस्थापक- मायक्रोमॅक्स), श्रीमती पूजा बेदी (अभिनेत्री व टीव्ही कलाकार), श्री. अंबर तिंबले (एमडी, फोमेंतो रिसोर्सेस आणि अध्यक्ष- जीएमओईए) यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या सहभागासह भारतातील उद्योग संधी या विषयावर आयोजित ‘गोल २०२०’ चर्चासत्राचे समन्वयन सीएनएन आयबीएनच्या पत्रकार श्रीमती फातिमा करण यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी ईओ-गोवा चॅप्टरचे अध्यक्ष श्री. अश्विन खलप म्हणाले, “पिअर-टु-पिअर नेटवर्क, तज्ञांसमवेत संवाद साधत गोव्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्याविषयक आणि जीवन समृद्ध करण्याचे अनुभवांच्या विचाराने मी प्रेरित झालो आहे. उद्योजक हे भविष्यातील जगाचे नेतृत्व आहेत आणि त्यामुळे जागतिक पातळीवरील उद्योजकांसमवेत सहज संपर्क, संवाद साधता येईल असे संपर्कजाळे विकसित करणे ही काळाची गरज ठरणार आहे.”
मेंबर चेअर श्री. सुमीत भोबे म्हणाले, “उद्योजकांनी उद्योजकांसाठी उभारलेले पिअर-टु-पिअर जाळे म्हणजे ईओ होय. जगभरातील ५४हून अधिक देशांमध्ये विविध प्रादेशिक, सांस्कृतिक, आर्थिक घटकांना जोडत आणि समविचारी उद्योजकांना एका मंचावर आणत ईओचे जाळे विस्तारले गेले आहे. ईओच्या सदस्यांसाठी प्रमुख साधन म्हणजे असा फोरम ज्याद्वारे सदस्यांमध्ये विश्वसनीय अशा वातावरणात संवाद साधण्याची, आपले अनुभव व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे गोव्यातील सर्व उद्योजक, व्यावसायिकांना मी आवाहन करतो की त्यांनीही ईओ-गोवामध्ये सहभागी होऊन वैयक्तिक जीवनात तसेच व्यावसायिक आयुष्यात ईओचा कसा व्यापक परिणाम होतो याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.”
१९८७पासून, ईओने अनेक उद्योजकांना घडवले असून आज हे उद्योजक सार जग बदलवण्यासाठी योगदान देत आहेत. उद्योग क्षेत्रातील एक जागतिक वैचारिक नेतृत्व म्हणून जगभरातील उद्योग, व्यवसाय आणि उद्योजकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणून ईओने आपले स्थान पक्के केले आहे.
ईओद्वारे आपल्या विविध चॅप्टरच्या माध्यमातून उद्योजकांसाठी विविध शिक्षण, विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. विविध क्षेत्रांतील चतुर, हुषार नेतृत्वांना एकत्र आणून यश, एकात्मता आणि ज्ञानाचा प्रसार करण्यात उपयुक्त व्यासपीठ म्हणून यश कमावले आहे. जगभरातील उद्योग तंज्ञांकडून आयुष्यभरासाठी अनुभव आणि संधींची शिदोरी मिळवण्यासाठी एक सर्वोत्तम संधी ईओने उपलब्ध केली आहे.
या प्रसंगी ईओ-दक्षिण अशिया विभागीय अध्यक्ष श्री. चिरंजिव पटेल, दक्षिण अशिया प्रदेश संचालक श्री. संदीप गोएल, ईओ लॉंच एक्स्पर्ट श्री. योगेश आर्य, ईओ गोवाचे अध्यक्ष श्री. अश्विन खलप, चॅप्टर-अध्यक्ष, श्री. सुमीत भोबे (सचिव), लर्निंग चेअर श्री. अशीन लालजी, फोरम चेअर श्री. राजेश धेंपे, स्ट्रॅटेजिक अलायन्स चेअर श्री. ऑस्कर डि लिमा परेरा, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स चेअर श्री. अर्पित अगरवाल, फायनान्स चेअर श्री. व्यंकट मुपन्ना आदींची उपस्थिती होती.
सध्या ईओ-गोवाचे १७ सदस्य अशून अनेक उद्योजक या नेटवर्कमध्ये सहभागी होण्याची इच्छुक आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर उद्योग क्षेत्रातील मान्यवरां समवेत भोजन मेजवानीही पार पडली. या उपक्रमासाठी खवंटे मोटर्स इंडियाचे सहकार्य लाभले.
आंत्रप्रिन्युर्स ऑर्गनायझेशन विषयी :
आंत्रप्रिन्युर्स ऑर्गनायझेशन (ईओ) ही जागतिक पातळीवर ५८हून अधिक देशांमधील १७० चॅप्टरच्या माध्यमातून ११,०००हून अधिक उद्योजकांना एकत्र आणलेले पिअर-टु-पिअर नेटवर्क आहे. १९८७साली स्थापन झालेल्या या नेटवर्कने जगभरातील उद्योजकांना नवनवे शिकण्याची, व्यवसाय विकास आणि विस्तार करण्याची संधी मिळवण्यासाठी एक प्रेरक म्हणून भूमिका बजावली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : https://www.eonetwork.org