आंत्रप्रिन्युर्स ऑर्गनायझेशन (ईओ)ची शाखा गोव्यात सुरू होणार

0
999

गोवाखबर: जगातिक सर्वांत मोठे पिअर-टु- पिअर व्यावसायिकांचे जाळे
असलेल्या आंत्रप्रिन्युर्स ऑर्गनायझेशन (ईओ)नेगोल२०२०’च्या उद्दिष्टासह ईओ-गोवा चॅप्टरची ४ मे
२०१८ रोजी स्थापना करण्याच्या माध्यमातून गोव्यात प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे.
दक्षिण अशिया विभागात नुकत्याच प्रवेश केलेल्या ईओचा ईओ-गोवा हा २१वा चॅप्टर ठरणार
आहे. ईओ गोवाच्या माध्यमातून औषध निर्मिती, उत्पादन, अन्न आणि पेय उत्पादने, माहिती तंत्रज्ञान,
वाहन उद्योग, शिक्षण आणि प्रशिक्षण, रिअल इस्टेट आदी क्षेत्रांतील उद्योजकांना एका व्यासपीठावर
येऊन आपले व्यवसाय जाळे विस्तारित करण्यास संधी मिळणार आहे. आपले समूहजाळ्यामध्ये
अधिकाधिक उद्योजक, व्यावसायिकांना सामावून घेण्याबाबतचे आगामी पाच वर्षांचे विस्तार धोरण या
चॅप्टरने आखलेले आहे.
ईओ गोवामध्ये   अश्विन खलप, चॅप्टर-अध्यक्ष,  सुमीत भोबे
(सचिव),  व्यंकट मुपन्ना (फायनान्स चेअर), ऑस्कर परेरा (स्ट्रॅटेजिक अलायन्स चेअर),
राजेश धेंपे (खजिनदार), अशीन लालजी (लर्निंग चेअर),  अर्पित अगरवाल (मारकॉम चेअर)
आणि श्री. आकाश खंवटे (सदस्य) सदस्य असतील
याप्रसंगी ईओ गोवाचे मारकॉम चेअर अर्पित अगरवाल म्हणाले, ईओ ही खास
व्यावसायिकांसाठीची आंतरराष्ट्रीय समूहव्यासपीठ आहे. या व्यासपीठाद्वारे सदस्यांना परस्परांचे
अनुभवातून नवे शिकण्याची आणि विकसित होण्याची आणि त्याद्वारे व्यक्तिगत जीवनासह
व्यवसायामध्ये यशाची नवी उंची गाठण्यास मदत होत असते. गोव्यातील काही प्रमुख उद्योजक या
व्यासपीठामध्ये सहभागी झाले असून लवकरच आणखी सदस्य सहभागी होतील असे सांगताना मला
आनंद होत आहे. ईओच्या माध्यमातून प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपलब्ध होणाऱ्या

संधींचा लाभ गोमंतकीय उद्योजकांनी घ्यावा, असे माझे सर्व गोमंतकीय उद्योग क्षेत्राला आवाहन
आहे.
१९८७पासून, ईओने अनेक उद्योजकांना घडवले असून आज हे उद्योजक सार जग
बदलवण्यासाठी योगदान देत आहेत. उद्योग क्षेत्रातील एक जागतिक वैचारिक नेतृत्व म्हणून
जगभरातील उद्योग, व्यवसाय आणि उद्योजकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणून ईओने
आपले स्थान पक्के केले आहे.
ईओद्वारे आपल्या विविध चॅप्टरच्या माध्यमातून उद्योजकांसाठी विविध शिक्षण, विकासाला
चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. विविध क्षेत्रांतील चतुर, हुषार नेतृत्वांना एकत्र आणून
यश, एकात्मता आणि ज्ञानाचा प्रसार करण्यात उपयुक्त व्यासपीठ म्हणून यश कमावले आहे.
जगभरातील उद्योग तंज्ञांकडून आयुष्यभरासाठी अनुभव आणि संधींची शिदोरी मिळवण्यासाठी एक
सर्वोत्तम संधी उपलब्ध केली आहे.
आंत्रप्रिन्युर्स ऑर्गनायझेशन विषयी :
आंत्रप्रिन्युर्स ऑर्गनायझेशन (ईओ) ही जागतिक पातळीवर ५८हून अधिक देशांमधील १७० चॅप्टरच्या
माध्यमातून ११,०००हून अधिक उद्योजकांना एकत्र आणलेले पिअर-टु- पिअर नेटवर्क आहे. १९८७साली
स्थापन झालेल्या या नेटवर्कने जगभरातील उद्योजकांना नवनवे शिकण्याची, व्यवसाय विकास आणि
विस्तार करण्याची संधी मिळवण्यासाठी एक प्रेरक म्हणून भूमिका बजावली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
https://www.eonetwork.org