आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील चौथा दिवस

0
538

 

गोवा खबर: यंदा गोव्यामधील अंचिमचे हे सुर्वण महोत्सवी वर्ष आहे. गोव्यामध्ये दहा हजारांपेक्षा अधिक प्रतिनिधींची या अंचिममध्ये नोंदणी झालेली आहे.

आज कला अकादमीच्या कृष्णकक्षात एचएफडीसीची चित्रपट क्षेत्रामधील महत्वाची भूमिका या विषयावर आधारित संवाद साधला गेला. यासाठी अतुल कुमार तिवारी, शाजी एन करूण, राघवेंद्र सिंह, टी.सी.ए कल्याणी उपस्थित होते. कॅजेटिन वाझ यांनी या विषयावर अनेक प्रश्न विचारले. सुरवातीस एनएफडीसीचीने त्यांनी केलेल्या कार्याचा दृश्यत्माक स्वरूपात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना परिचय करून दिला. एनएफडीसीच्या एमडी श्रीमती. टी.सी.ए कल्याणीने एनफडीसीच्या कार्याची अधिक तपशीलात माहिती दिली. अंचिमचे गाणे हे एनएफडीसीची निर्मिती असल्याचे तिने सांगितले. शाजी एन करूण यांनी चित्रपटाच्या प्रायव्हर्सी बद्दल सांगताना म्हणाले की चित्रपट ही सलग पाहण्याचे दृश्य आहे. त्यासाठी आवाज तंत्रज्ञान, दृश्य तंत्राज्ञानाचे कौशल्या त्यामध्ये वापरलेले असते. यासाठी चित्रपट हे चित्रपटगृहात पाहणे अधिक योग्य असते. जर एखादा सिनेरसिक जर चित्रपट मोबाईलवर पाहत असेल तर तो त्या पुर्णांगाने आस्वाद घेऊ शकत नाही असल्याचेही सांगितले. राघवेंद्र सिंह व अतुल कुनार तिवारी यांनी एनएफडीसी आणि भारतीय चित्रपटाविषयी महत्त्वाचे मुद्दे प्रकट केले. शेवटी उपस्थित असलेल्या सिनेरसिकांनी संबंधित विषयावर काही प्रश्न केले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे उपस्थित तज्ज्ञाने दिली.

तापसी पन्नू ही सध्याची आघाडीची अभिनेत्रीने आहे.  मेकनिज पॅलेसमध्ये तिने आपला चित्रपटप्रवास सांगितला. तिने आपल्या कारकीर्दची सुरवात तेलगू चित्रपटापासून केली. प्रादेशिक चित्रपटाहून ती हिन्दी चित्रपटामध्ये सक्रिय झाली. चित्रपटात यायच्या अगोदर ती मॉडेलिंग करायची. ‘मिनल अरोरा’, ‘पिंक’, ‘चष्मे बहादुर’, ‘दिल जंगली’, ‘जुडवा २’ असे तिने चित्रपट केलेले आहे. तिने केलेल्या ‘सुरमा’ चित्रपटामधील हरप्रीत ही भूमिकाची लोकांना अधिक आवडली व तिची प्रशंसाही झाली. ती म्हणाली अधिक चित्रपट हे पुरूषकेंद्री असतात त्यामुळे स्त्री भूमिकावर आधारित अधिक चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे. त्याचबरोबर हिरो व हिरोईन या दोघांना समान मानधन मिळाले पाहिजे. त्यामध्ये भेदभाव करता कामा नये. शेवटी तिने आगामी वर्षात तिचे सात चित्रपट येणार असल्याचे सांगितले.

अंचिम प्रतिनिधीशी हितगुज करताना पुण्यातून आलेल्या श्रीमती शिल्पा हट्टगंडीने सांगितले की ती पहिल्यांदा अंचिममध्ये प्रतिनिधी म्हणून आली आहे. ती एस.एन.डी.टी या महिला विद्यापीठाची सहाय्यक प्राध्यापक आहे. त्याने अंचिममधल्या निवडलेल्या चित्रपटांचे कौतुक केले. व्यावसायिक सिनेमापेक्षा आर्ट सिनेमा तिला अधिक आवडते व त्याच चित्रपटाकडे पाहण्याचा अधिक कल आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. सीमा नाईक नावाची गोव्याची मुलगी ही धेंपे कॉलेजमधील शिकणारी विद्यार्थीनीने आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली आपण अंचिमला येते. यंदाचा अंचिम हा अधिक विशेष आहे. रात्रीचे केलेली आकर्षक अशी नेत्रदीपक रोषणाई अधिक भावते. फुटपाथावर असलेले गोमंतकीय पदार्थ व कला अधीक आवडत असल्याचे सांगितले.