आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 साठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरु

0
1195

 

 

 

 

गोवा खबर:49 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 20-28 नोव्हेंबर 2018 दरम्यान पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आंचिम) हा जगभरातील चित्रपटांसाठी एक महत्वाचे व्यासपीठ आहे. तसेच आशियात होणारा अतिशय प्रतिष्ठीत आणि पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे.

 

चित्रपट हे लोकांना जोडणारे माध्यम आहे तसेच मानवी भावना समजून घेणारे आहे. आंचिममध्ये विविध देशांतील चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची देवघेव होते. त्यातून जागतिक समुदायामध्ये मैत्रीचे वातावरण निर्माण होते.

 

माध्यमांमुळे चित्रपट महोत्सवाला चैतन्य प्राप्त होते. चित्रपट महोत्सवाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम माध्यमांकडून होते. चित्रपट महोत्सवाचा संदेश जनसामान्यांमध्ये पोहचवण्याचे काम माध्यमं करतात.

 

पत्र सूचना कार्यालय माध्यम प्रतिनिधींना आंचिम 2018 साठी नोंदणी करण्याचे आवाहन करते. 10 नोव्हेंबर पर्यतhttps://my.iffigoa.org/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. तर, 16 नोव्हेंबरपासून आंचिम ओळखपत्र वितरीत केले जातील.