
गोवाखबर:नवी दिल्लीत 22 एप्रिलपासून सुरु असलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय एसएमई अर्थात लघु आणि मध्यम उद्योग परिषदेत भारतासह फिनलंड, इटली, रशिया आणि कंबोडिया मधल्या महिला उद्योजकांनी आपले यश, आपल्या मार्गात आलेले अडथळे याविषयीचे अनुभव कथन केले. महिला उद्योजकांसंदर्भातल्या या विशेष सत्राचे अध्यक्षपद सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे विकास आयुक्त आणि अतिरिक्त सचिव राममोहन मिश्रा यांनी भूषवले. महिलांनी स्वत: आपला उद्योग उभारावा यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय धोरण आखत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या परिषदेला ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, फ्रान्स, इंडोनेशिया, इटली, केनिया, कोरिया, मलेशिया, मोरोक्को, पोलंड, रशिया इत्यादी 37 देशातले एसएमई प्रतिनिधी सहभागी झाले. कृषी, आरोग्य, शिक्षण, कचरा व्यवस्थापन यासह इतर क्षेत्रातले लघु आणि मध्यम उद्योजकांचा यात समावेश होता.