आंचिममध्ये पर्रीकरांना माहितीपटाद्वारे आदरांजली

0
595
गोवा खबर:यंदाच्या सुवर्णमहोत्सवी आंचिममध्ये उद्घाटनाच्यावेळी मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित आाणि आंचिम सुरू झाल्यापासून त्यांच्या महोत्सवातील योगदानाचा दहा मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात येणार आहे. अशी माहिती गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली. 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आणण्यासाठी आणि महोत्सवाचे गोवा कायमचे ठिकाण बनवण्यासाठीचे महत्वाचे योगदान माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे होते. त्यामुळे यंदाच्या सुवर्णमहोत्सवी आंचिममध्ये उद्घाटनाच्यावेळी मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित आाणि आंचिम सुरू झाल्यापासून त्यांच्या महोत्सवातील योगदानाचा दहा मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात येणार आहे.
या माहितीपटातून पर्रीकरांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. आंचिम 2004पासून गोव्यात सुरू झाल्यानंतर किंवा तो सुरू करण्यासाठी मनोहर पर्रीकर यांचा सहभाग कोणीच विसरू शकत नाही. आंचिम गोव्यात आणून त्याचे कायमचे ठिकाण गोवाच करण्यात पर्रीकर यांचा मोलाचा वाटा आहे. सुवर्णमहोत्सवी आंचिम होत असताना पर्रीकरांना विसरता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यावरील माहितीपट दाखविला जाणार आहे अशी माहिती गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली.