आंगणवाडी आणि मोहल्ला क्लिनिक या आपसाठी प्राथमिकता

0
229
गोवा खबर : आम आदमी पार्टीच्या उमेदवार माटिल्डा डिसिल्वा यांनी आपल्या गावातील लोकांना भेट देत मोठ्या उत्साहात आपली प्रचार मोहीम सुरू केली आहे आणि मतदारसंघात अंगणवाड्या सुधारण्यावर भर देण्याबरोबरच प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
माटिल्डा यांनी नावेलीमधील अंगणवाड्यांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधले, ज्यात बर्‍याच अंगणवाड्यांना वीजपुरवठा नाही आणि काहींना पिण्याच्या पाण्याचे कनेक्शनही नाही. “या अंगणवाड्यांमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या आहाराची गुणवत्ता देखील आम्हाला माहिती नाही, ”त्या म्हणाल्या.
त्यांनी खेद व्यक्त केला की, मुलांना बसण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे त्यांना जमिनीवर बसायला भाग पाडले जाते आणि काही अंगणवाड्यांमध्ये अगदी छतावरील फरशा गहाळ झाल्याचे उघडकीस आले, तर बर्‍याच ठिकाणी छप्पर गळत आहे.
“आपण पाहिले आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीतील अंगणवाड्या कशाप्रकारे चालतात आणि त्याच मॉडेलची प्रतिकृती येथे आणली जाईल, जेथे मुले येतील तेथे त्यांना जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये मिळतील,” असे सांगताना त्यांनी दिल्लीतील मॉडेल पुन्हा नावेली येथे पुनरागमन करणार असल्याचे नमूद केले.
माटिल्डा यांनी हे ही निदर्शनास आणून दिले की, नावेलीधील आरोग्य सेवा निराशाजनक आहेत कारण डॉक्टर वारंवार गैरहजर असतात आणि परिचारिकाच रुग्णांची तपासणी करतात. “माझ्या मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात दिल्लीसारख्या मोहल्ला क्लिनिक उभारण्याचा मी प्रयत्न करेन,” असे निवडणुकीत आपला मतदान करा, हे सांगताना त्या म्हणाल्या.