अॅमेझॉन , फ्लिपकार्टचा ग्रेट इंडियन सेल

0
1075

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी स्वातंत्र्यदिना मुहूर्त साधला आहे. अॅमेझॉन ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान ‘ग्रेट इंडियन सेल’ सुरू करणार आहे. तर, अॅमेझॉनची प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टनेही ९ ते ११ ऑगस्टला ‘सेल’ची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांच्या या स्पर्धेत ग्राहकांचा फायदा होणार आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांच्या बिग सेलमध्ये बड्या ब्रँड्सच्या वस्तूंवर मोठी सवलत मिळणार आहे. यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून फर्निचर, कपडे, किचनमधील सामानावर चांगला डिस्काउंट मिळू शकणार आहे. अॅमेझॉन कंपनी आयफोनसह अन्य मोबाइल खरेदीवर ३५ टक्के डिस्काउंट देणार आहे. तर फ्लिपकार्टवर ‘गुगल पिक्सल’ हा फोन केवळ १८ हजारात मिळणार आहे. ही या फोनची सर्वात कमी किंमत आहे. तसेच अन्य काही कंपन्याच्या स्मार्टफोन्सवरही डिस्काउंटसह मोठी कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे.

अॅमेझॉन सॅमसंग, एलपीजी आणि ब्ल्यू स्टार एसीवर ३२ टक्के डिस्काउंटसह २ हजार २५० रुपयांच्या ईएमआयवर एसी देत आहे. तर फ्लिपकार्ट हीच ऑफर टीव्हीवर देत आहे. फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर ६ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे. अॅमेझॉनच्या सेलमध्ये जवळपास १२०० ब्रँड्सच्या ३ लाख उत्पादनांवर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देत आहे. यात फुटवेअर, कपडे, दागिने, घड्या आणि हँड्सबँगचा समावेश आहे.