अॅपलचे २ नवीन फोन होणार भारतात लाँच

0
2731

आयफोन युजर्ससाठी अॅपल एक खुशखबर घेऊन येणार आहे. अॅपल कपंनी ‘४ इंची आयफोन’, ‘आयफोन SE’ पुन्हा एकदा लाँच करण्याच्या तयारीत आहे, असा दावा तैवानमधील एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तातून करण्यात आला आहे. वेबसाइटच्या वृत्तानुसार पुढच्याच वर्षी कपंनीने हे दोन नवीन आयफोन भारतात लाँच करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

विस्ट्रॅान कंपनीच्या एका अहवालानुसार हे आयफोन विस्ट्रॅान कंपनी तयार करणार आहे. मागच्या मे महिन्यात अॅपल कंपनीने बेंगळुरूमध्ये आयफोन SE स्मार्टफोन्सच्या एकत्रिकरणासाठी विस्ट्रॅान कॉर्पसह भागीदारी केली होती. भारतातील उत्पादन वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारकडे अधिक जमीन मिळवण्याबाबत बोलणी केली आहे. यामुळे आम्ही आगामी वर्षांमध्ये उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करु, असं कंपनीने म्हटलंय.

अॅपल कंपनी भारतातील आपली बाजारपेठ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आयफोन SE मॉडेलवर अॅपल कंपनीला १० टक्के सवलत मिळणार आहे. यामुळे कंपनीला भारतातील स्पर्धात्मक किमतींवरील मॉडेल लाँच करण्यास मदत होईल. अॅपलला भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. यामुळे आम्ही भारतात फोन लाँच करण्यासाठी उत्सुक आहोत, असं अॅपलचे सीईओ टीम कूक म्हणाले. या वर्षी एप्रिलमध्ये अॅपल ३२ जीबी आयफोन SE मॉडेल लाँच करणार आहे.