अॅडवेन्त्झ ग्रुप आयोजित युथ फॉर टुमारो उपक्रमाची वैशाली सामंतच्या कार्यक्रमाने सांगता

0
871

 

 झेडएसीलच्या या उपक्रमात २७ शाळांमधील ३००हून अधिक विद्यार्थ्यांनी दाखवली आपली प्रतिभा
पणजी: गोव्यात आयोजित तीन दिवसीय युथ फॉर टुमारो २०१७ या उपक्रमाची आज सांगता
झाली. या उपक्रमात २७ शाळांमदून आलेल्या ३००हून अधिक विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, संगीत आणि गायन क्षेत्रांमधील
आपले कलागुण सादर केले. चेअरमन सरोज कुमार पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली २५ कंपन्यांचा समूह म्हणून
कार्यरत असलेल्या अॅडवेन्त्झ ग्रुपद्वारे दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. गोव्यात उत्पादन प्रकल्प असलेली
झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेड ही अॅडवेन्त्झ ग्रुपमधील एक प्रमुख कंपनी आहे.
यंदा कृषी-नावीन्यतेला अडवेनत्झचे प्रोत्साहन (अॅडवेन्त्झ सेलिब्रेट्स अग्री-इनोवेशन) अशी या उपक्रमाची संकल्पना
आखण्यात आली होती. उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांसाठीच्या जय किसानअॅपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते
उद्घाटन करण्यात आले. यंदा शासकीय, अनुदानित, खासगी अशा २७हून अधिक शाळांमधील विविध शाखांतील
विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. त्याचबरोबर एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे डॉ. परशुरामन,
गोव्यात हायड्रापोनिक तंत्रज्ञानावर शेती करणारे प्रसिद्ध शेतकरी अजय नाईक यांच्यासह विविध मान्यवरांची
व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले.
थ फॉर टुमारो उपक्रमाच्या सांगता समारंभास गोव्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, राज्याचे शिक्षण
संचालक गजानन पी. भट यांची उपस्थिती राहिली. तसेच भारतातील आघाडीची संगीतकार, गीतकार आणि
पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या मंत्रमुग्ध सादरीकरणाने या उपक्रमाचा पडदा पडला.
वैशाली सामंत म्हणाल्या, ;युथ फॉर टुमारोच्या या स्पर्धेत आपली कला सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पाहताना मला माझ्या
विद्यार्थिदशेची आठवण झाली. मुंबईतील विले पार्ले (पश्चिम) भागातील ती एक स्थानिक स्पर्धा होती. तेव्हा मी दहावी किंवा
अकरावीत शिकत होते. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेत भाग घेता आणि ती जिंकलेही. या स्पर्धेतून मला मोठा
आत्मिविश्वास मिळाला आणि या क्षेत्रात करिअर करण्यासाठीची दिशा मिळाली. अॅडवेन्त्झ झेडएसीएल सारख्या कंपन्या
युवा पिढीतील प्रज्ञाशोध घेऊन त्यांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करत असल्याची बाब चांगली आहे."
झुआरी अॅग्रो केमिकल्स लिमिटेडचे सुनील सेठी यांनी १९७५ ते १९८१ या आपल्या विद्यार्थिदशेतील आपल्या
आठवणींना उजाळा देत या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला दाद दिली. ते म्हणाले, “विविध भाषा,
संस्कृती आणि शाळांमधून एकत्र येत या विद्यार्थ्यांनी युथ फॉर टुमारोच्या यंदाच्या उपक्रमाचे यश एका नव्या
उंचीवर नेऊन ठेवले.”

ते पुढे म्हणाले, “आधुनिक भारताचा पाया घडविला जात असताना १९६० दशकाच्या मध्यकाळात हरितक्रांतीची बिजे
रोवली जात असताना झुआरीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या विचारसरणीचा गाभा हा शेतकऱ्यांना सक्षम
करणे हा राहिला आहे. जय किसान या ब्रँडचा जन्मही याच काळात झाला आणि मला खरोखरच अभिमान वाटतो
की आज आपण या कंपनीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहोत. या ५० वर्षांच्या वाटचालीत हरित ते सोनेरी असे

परिवर्तन घडले आहे. बुधवारी अॅडवेन्त्झ ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर
यांच्या हस्ते जय किसान मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल इंडियाच्या युगात नेहमीच कार्यमग्न
असलेल्या शेतकऱ्याला या अॅपच्या माध्यमातून बहुविध सेवा उपलब्ध झाली आहे. आता ५० वर्षांचा टप्पा पार केला
असून लोकांसाठी, विशेषत- गोव्यामध्ये लोकांसाठी कार्यरत राहण्याचा झुआरीचा वसा असाच पुढे सुरू राहणार आहे.
व्यावसायिक जबाबदारी पूर्ण करणे हे आमच्यामध्ये भिनले गेले आहेच त्याचबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाचे
कर्तव्य म्हणून समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबवणे, निधी उपलब्ध करण्याचे आमचे व्रत असेच कायम
सुरू राहणार आहे.”
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची निवड शालेय पातळीवर करण्यात आली. पुढे उपांत्य फेरी व अंतिम फेरी आयोजित
केली गेली. युथ फॉर टुमारेच्या स्पर्धा प्रकारांमध्ये एकल व समूह गायन, वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा कोकणी व
इंग्रजी भाषांमध्ये पार पडली.