अहमद पटेल यांचे निधन

0
159

गोवा खबर : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे करोनाने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘अहमद पटेल यांच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. सार्वजनिक आयुष्यात ते बराच काळ जगले आणि त्यांनी समाजाची सेवा केली. तीक्ष्ण बुद्धी आणि कॉंग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल ते कायम स्मरणात राहतील. पटेल यांचा मुलगा फैसल यांच्याशी बोलताना त्यांनी आपला शोक व्यक्त केला. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो.’