अस्नोड्यात दोन प्रकल्पाचे उद्घाटन

0
540

गोवा खबर:खासदार निधीतून उभारण्यात अलेल्या दोन नवीन प्रकल्पांचे उद्घाटन उत्तर गोवा खासदार तथा आयुषमंत्री (स्वतंत्रविभाग)  श्रीपाद नाईक यांच्याहस्ते अस्नोडा येथे करण्यात आले.

अस्नोडा मार्केट कॉम्प्लेक्समध्ये १५ लाख रूपये खर्चून सुरू करण्यात आलेला जिमखाना व अवरलेडी ऑफ हेल्थ कपेलमधील सभागृहाचा समावेश आहे.

यावेळी बोलताना आयुषमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी आजच्या पिढीने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून निरोगी भारत देश घडविण्यासाठी प्रत्येकाने सक्षम होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

 आपल्या भषणात  श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, आपले आरोग्य तंदुरूस्त असले तर जीवनात काहीही करता येते. चुकीच्या जीवन पध्दतीचा वापर सोडून देण्याची गरज असल्याचेही श्री. नाईक म्हणाले.

 यावेळी अस्नोडे गावचे सरपंच सौ. सपना मापारी यांचेही भाषण झाले. यावेळी व्यासपिठावर जिल्हा पंचायत सदस्य  गोविंद कूबल, स्थानिक पंच  मेघशाम चोडणकर, शंकर नाईक, उदय मापारी, प्रविण बुगडे,  सलोनी पेडणेकर, लक्ष्मण कवळेकर,  छाया डिचोलकर व सांतान फर्नाडिस उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी  छाया डिचोलकर यांनी आभार मानले.