असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याला कामगार मंत्रालयाचे सर्वोच्च प्राधान्य-संतोष गंगवार

0
1269
The Union Minister for Road Transport & Highways, Shipping and Water Resources, River Development & Ganga Rejuvenation, Shri Nitin Gadkari presenting the acceptance letters, at the International Labour Day programme, in New Delhi on May 01, 2018. The Minister of State for Labour and Employment (I/C), Shri Santosh Kumar Gangwar and the Secretary, Water Resources, River Development and Ganga Rejuvenation, Shri U.P. Singh are also seen.

गोवा खबर:कामगारांच्या कल्याणासाठी कल्पक मार्गाने काम करण्याचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज नवी दिल्लीत बोलत होते. कामगारांना उत्तम आरोग्य आणि गृहविषयक सुविधा पुरविण्यासाठी त्यांना ‘आयुष्मान भारत’ आणि प्रधानमंत्री आवास योजनेशी जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी यावेळी बोलताना कटिबद्धता व्यक्त केली. कामगार दिनानिमित्त कामगारांना शुभेच्छा देताना आपल्या मंत्रालयाचे आणि केंद्र सरकारचे कामगारांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.

ईपीएफओ आणि केंद्रीय कामगार आयुक्तालयाच्या अनेक नव्या उपक्रमांना गडकरी यांनी प्रारंभ केला. यामध्ये ईपीएफओच्या समवर्ती लेखा परिक्षण सॉफ्टवेअरचा समावेश आहे. ज्याद्वारे दाव्यांचा निपटारा, निवृत्तीवेतन, प्रॉव्हीडंट फंड संचयाचे हस्तांतरण करता येणार आहे.

केंद्रीय कामगार आयुक्तालयाच्या उपक्रमात श्रम सुविधा पोर्टलवर आठ कामगार कायद्याअंतर्गत ऑनलाईन वार्षिक विवरणपत्र दाखल करणे, बीओसीडब्ल्यू कायदा 1996, आयएसएमडब्ल्यू कायदा 1979 अंतर्गत ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जारी करणे यांचा समावेश आहे.