‘अवर स्टेज युवर टॅलेंट’ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील २० स्पर्धकांची नावे बिग डॅडी एंटरटेनमेंटकडून जाहीर

0
1129

 

 

गोमंतकीयांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने बिग डॅडी एंटरटेनमेंटच्या वतीने अवर स्टेज युवर टॅलेंट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गोमंतकीयांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वोत्तम कलाकारांना पुढे आणण्यासाठी आयोजित या वार्षिक स्पर्धेसाठी नृत्य, गायन, चित्रकार, जादूगार, बीट बॉक्सर, बँड, स्टँड-अप आणि मनोरंजन कलाकार यांचेकडून या स्पर्धेसाठी नामांकने सादर झाली. गोव्याच्या सर्वच भागांमधून स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धकांची कामगिरी पाहता, उपांत्य फेरीतील २० स्पर्धकांची निवड करताना परिक्षकांची मोठी कसोटी लागली. एकूणच गोव्यातील कलाविश्वाचे दर्शन या निमित्ताने पुन्हा एकदा झाले.

याबाबत गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा. लि.च्या मनोरंजन संचालिका झबिन खान म्हणाल्या, “यशस्वी व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या निवड फेरीनंतर मला वाटते की आमच्या अपेक्षांची पूर्तता झाली आहे. या सकारात्मक प्रतिसादातून गोव्यातील कलाविश्वातील वैविध्यता, श्रीमंती प्रतिबिंबित होते. आता कुठे ओएसवायटीच्या युगाला सुरवात होत असून भविष्यात ही स्पर्धा नवनव्या उंचीवर पोचेल.”
ओएसवायटीचे शो डायरेक्टर श्री. एलिस कादर म्हणाले, “हेच कलाकार गोव्याचे, भारताचे भविष्य आहेत. या कलागुणांना व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध कलागुणांनी संपन्न या कलाकारांना प्रकाशझोतात आणून आमच्या व्यासपीठाची महती वाढणार आहे. हा प्रतिसादच अवर स्टेज अँड युवर टॅलेंटचे व्यासपीठची ताकद आहे.”
प्रसिद्ध कोरिओग्राफर श्रीमती गीता कपूर या स्पर्धेचे परिक्षण करणार आहेत. बिग डॅडी एंटरटेनमेंटच्या या स्पर्धेत प्रसिद्ध स्टँड-अप कलाकार, अभिनेता, निवेदक, गायक, गीतकार आणि भारतातील पहिला इंग्रजी स्टँड-अप कॉमेडियन अॅश शँडलर १० व ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य तसेच अंतिम फेरीसाठीच्या परिक्षण पथकांमध्ये सहभागी आहेत.
ओवायएसटी- अवर स्टेज युवर टॅलेंट ही अनोखी स्पर्धा आहे ज्यामध्ये उभरत्या कलाकारांना एक व्यावसायिक व्यासपीठ मिळत असून मनोरंजन जगतात करिअर घडवण्यासाठीची कवाडे उघडून देणारी आहे. ओवायएसटी- अवर स्टेज युवर टॅलेंट स्पर्धेतील विजेत्याला ३ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, गिफ्ट हॅम्पर्स आणि बिग डॅडी कॅसिनोसाठी एक वर्षांसाठीचे करारपत्र अशी बक्षिसे मिळण्याची संधी आहे. या स्पर्धेतून गोव्यातील युवा कलाकारांची सर्जनशीलता फुलवण्याचा मान बिग डॅडी एंटरटेनमेंटला मिळत आहे.
उपांत्य फेरीतीसाठी पात्र २० स्पर्धक
क्र. स्पर्धकाचे नाव कलाविभाग
1 कल्पेश कुबल नृत्य
2 अमित आणि साक्षी नृत्य
3 संकेत मांद्रेकर स्पीड पेंटिंग
4 आकाश एन. शिरोडकर नृत्य
5 सुशांत संतोष गाड रॅपर
6 निक्सन फर्नांडिस व्हायोलिन/ट्रम्पेट वादन
7 सायन रॉड्रिक्स गायन
8 सेल्विन जेसी ब्रागान्झा व्हायोलिन वादन
9 रोकॅथो गोम्स आणि रियो फर्नांडिस कॉमेडी
10 यशवंत आमरोसकर बिट बॉक्स
11 नवाब शेख गायन
12 ऊर्जा नाईक गांवकर गायन
13 बेवन फर्नांडिस गायन
14 आकाश मंगेशकर गायन
15 ग्रूव्ह दक्सिना बँड
16 गुरुदत्त वांतेकर स्पीड पेंटिंग
17 टेक फाइव्ह बँड
18 स्मृती प्रभूदेसाई एकपात्री
19 डेरिल आणि प्राची नृत्य
20 झिब्रान सय्यद बिट बॉक्स