अल्पसंख्यांकांच्या वाढत्या लोकसंख्येवर आता नियंत्रण न आणल्यास देशाचे विभाजन अटळ ! – सुरेश चव्हाणके

0
991

लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठीची ‘सुदर्शन न्यूज’चे संचालक सुरेश चव्हाणके यांची ‘भारत बचाओ रथ यात्रा’ गोव्यात दाखल !

पणजी – अल्पसंख्यांकांच्या वाढत्या लोकसंख्येवर आता नियंत्रण न आणल्यास देशाचे विभाजन अटळ आहे. ही स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची लढाई आहे. या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सुदर्शन न्यूज’चे संचालक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठीच्या ‘सुदर्शन न्यूज’चे संचालक  सुरेश चव्हाणके यांच्या ‘भारत बचाओ रथयात्रे’चे २७ मार्च या दिवशी गोव्यात आगमन झाले. यानंतर सायंकाळी पणजी येथील आझाद मैदानात एका जाहीर सभेत बोलतांना ‘सुदर्शन न्यूज’चे संचालक  सुरेश चव्हाणके यांनी हे आवाहन केले. रथयात्रेसोबत आलेल्या सौ. माया चव्हाणके,  विवेकानंद, प्रणवभाई आदींचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले.
चव्हाणके पुढे म्हणाले, ‘‘जेव्हा हिंदु समाज विभाजीत झालेला आहे किंवा हिंदू अल्पसंख्य झालेले आहेत, तेव्हा देश विभाजीत झालेला आहे. चीनमधील मुसलमान एक अपत्य कायदा मानू शकतात, तर भारतातील मुसलमानांना अशा स्वरुपाच्या कायद्याचे पालन करण्यास काय अडचण आहे ? लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत १० लक्ष स्वाक्षर्‍या घेण्याचे नियोजन आहे. समस्त हिंदूंनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे. हा लढा आपण जोखीम स्वीकारून लढत आहे.’’ प्रारंभी रथयात्रेचे पणजी येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ  राजू विर्डीकर, मगोपचे शिवप्रसाद जोशी, भारतीय संस्कृती रक्षा मंचचे शैलैंद्र वेलिंगकर, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक  गोविंद चोडणकर,  राजश्री गडेकर,  जयेश थळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी ‘भारत बचाओ रथयात्रा’ गोव्यात आल्यावर तिचे मडगाव येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले. रथयात्रा मडगाव येथे पोहोचल्यावर भोलसे सर्कल येथे ‘सुदर्शन न्यूज’चे संचालक सुरेश चव्हाणके यांचे रणरागिणीच्या कार्यकर्तींनी दीप ओवाळून करून स्वागत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी उपस्थित होते. यानंतर घोगळेश्‍वर मंदिर, घोगळ येथे ‘शिवसाम्राज्य’ संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र देऊन ‘सुदर्शन न्यूज’चे संचालक सुरेश चव्हाणके यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर वास्को येथेही ‘भारत बचाओ रथयात्रे’चे येथील श्री दामोदर मंदिराकडे पोहोचल्यावर तिचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले. या वेळी ‘मुरगाव युवा मंच’, ‘भारत माता की जय’, ‘हिंदु जनजागृती समिती, ‘सनातन संस्था’ आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.