अल्पवयीन पर्यटक मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी प.बंगालच्या पर्यटकास अटक

0
1250
गोवा खबर:कांदोळी किनाऱ्यावर आपल्या नातेवाईकां सोबत समुद्र स्नान करणाऱ्या एका अल्पवयीन पर्यटक मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी प.बंगाल येथील रियाजुल सय्यद या 24 वर्षीय युवकाला अटक केली आहे.
या घटने संदर्भात त्या मुलीच्या काकीने तक्रार नोंदवली. त्यानंतर स्वयंसेवी संस्थेच्या उपस्थितीत त्या मुलीचा जबाब नोंदवून घेण्यात आला.कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी तक्रार दाखल होताच सय्यद याला अटक करून त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.सय्यद विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.