अल्पवयीनावर अत्याचार; तिघांना जन्मठेप

0
988

 

मडगाव रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने तिघाजणांना जन्मठेपेची शिक्षा तसेच दोन लाख रुपये दंड ठोठावला आहे. २१ जानेवारी २०१३ रोजी हा प्रकार घडला होता.
प्रीतेश सरकार, लक्ष्मीकांत गहीर व यशवंत साहू अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम पीडित मुलाला देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.