अर्धवेळ नको पूर्णवेळ लॉकडाऊन करा विजय सरदेसाई  यांचा सल्ला

0
630
गोवा खबर: एकाच दिवशी 170 कोरोना रुग्ण आढळून येणे म्हणजे राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे हे स्पष्ट होत आहे. जर हा उद्रेक थोपवून धरायचा असेल तर  अर्धवेळ नव्हे तर पूर्णवेळ लॉकडाऊन जाहीर करण्याची गरज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
 या सरकारने गोवेकारांच्या आरोग्याशी घात केला आहे. भाजपचे मंत्री आणि आमदार वास्कोत लॉकडाऊन करा अशी मागणी करत असतानाही केवळ अदानीच्या कोळश्याची सुरळीत वाहतूक व्हावी आणि खनिज वाहतूक चालू राहावी यासाठीच सरकारने गोवेकरांचा जीव धोक्यात घातला,असा आरोप सरदेसाई यांनी केला.

आता तरी सरकारने लोकांच्या जीवाशी खेळणे बंद केले पाहिजे. कोरोना गोव्यातील सर्व गावात पोहोचण्यापासून रोखायचे असेल तर 10 ते 15 दिवसासाठी पूर्ण लॉकडाउन जारी करा आणि या मधल्या वेळेत आरोग्य सुविधा जागेवर घाला असा सल्ला सरदेसाई यांनी दिला.
सरदेसाई म्हणाले, राज्याच्या सीमा उघडू नका असे  आम्ही परत परत सांगत होतो पण सरकारने आमचे न ऐकता पर्यटकांसाठी राज्याचे दरवाजे खुले केले आणि कोरोनाला आमंत्रण दिले. आता ही परिस्थिती नितंत्रणात आणणे सरकारला श्यक्य होत नाही. त्यामुळेच आता हे सरकार खाजगी आरोग्य आस्थापनाना वेठीस धरू पाहते. तुमचा भार खासगी इस्पिटलावर टाकू नका,असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
राज्यात लोकांच्या जलद आणि व्यापक प्रमाणावर चाचण्या घ्या जेणेकरून गोव्यातील स्थिती कशी आहे ते कळून येईल असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.