अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना 

0
813
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले स्वागत 
गोवा खबर:अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या उभारणीसाठी सरकारने 67 एकर जमीन या समितीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत दिली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अयोध्येतील राम मंदिर उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर लोकसभेत पंतप्रधान मोदींनी यासंर्भातील घोषणा केली.

मोदी म्हणाले, अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. राममंदिराची निर्मिती आणि त्याच्यासंबंधीचे निर्णय घेण्यासाठी या समितीला स्वायत्तता असेल. अयोध्येत प्रभू रामांचे भव्य दिव्य असे मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी योजना आखण्यात आली असून, सरकारने 67 एकर जमीन या समितीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्याची सूचना ऊत्तर प्रदेश सरकारला करण्यात आली आहे, असेही मोदींनी सांगितले.