अमित शहा यांना हिंदी पुस्तक हवे होते :मुख्यमंत्री 

0
448
गोवा खबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा त्यांना मनोहर पर्रीकर यांच्या चांगल्या योगदानावर प्रकाश टाकणारे पुस्तक हिंदी व इंग्रजीत यावे असे वाटत होते. त्यांनी माझ्याकडे तसे बोलूनही दाखवले होते. आता पर्रीकर यांच्यावर इंग्लिशमध्ये पुस्तक आले, यापुढे कदाचित हिंदीतही येईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
पर्रीकरांवरील इंग्लिश पुस्तकाचे बुधवारी सचिवालयात उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. आपण मराठी पुस्तकाची प्रत शहा यांना दिली होती, त्यावेळी शहा यांनी मराठी पुस्तकात पर्रिकर यांचा एकही फोटो नाही असे निरीक्षण नोंदवले होते. हिंदी व इंग्लिशमध्ये पुस्तक यायला हवे असे मला व शहा यांनाही वाटत होते. आता इंग्लिश पुस्तक आल्याने आपण लेखक सदगुरु पाटील व मायाभूषण नागवेकर तसेच प्रकाशक पेंग्विन रेण्डम हाऊस यांचे अभिनंदन करतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान बुधवारी सकाळी पुस्तकाविषयी शोभा डे यांनीही ट्वीट केले व आपल्यालाही पुस्तकाविषयी उत्सुकता आहे हे दाखवून दिले. अलिकडेच ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही पण पुस्तकाविषयी ट्विट केले आहे.

पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा त्यांना मनोहर पर्रीकर यांच्या चांगल्या योगदानावर प्रकाश टाकणारे पुस्तक हिंदी व इंग्रजीत यावे असे वाटत होते. त्यांनी माझ्याकडे तसे बोलूनही दाखवले होते. आता पर्रीकर यांच्यावर इंग्लिशमध्ये पुस्तक आले, यापुढे कदाचित हिंदीतही येईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.