अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माइलचा अखर खात्मा

0
910

लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू इस्माइलला श्रीनगरजवळील नौगाममधील अरिबाग येथे आज चकमकीत ठार मारण्यात आले. चकमकीत अबूचा अन्य एक साथीदारही मारला गेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

१० जुलै रोजी लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ७ यात्रेकरूंना जीव गमवावा लागला होता, तर १९ जण जखमी झाले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला दहशतवादी अबू इस्माइलच्या शोधात होत्या.

आज अरिगाम भागात अबू सुरक्षा दलाच्या सापळ्यात अडकला. यावेळी जोरदार चकमक होऊन त्यात अबूला ठार करण्यात आले. अबूसह छोटा कासिम यालाही ठार करण्यात आले असून दोघेही पाकिस्तानातील होते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.