अभिनेते सीताराम पांचाल यांचं निधन

0
1043

‘जॉली एलएलबी’, ‘पानसिंग तोमर’ आणि ‘पीपली लाइव्ह’ सारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते सीताराम पांचाल यांचं आज सकाळी ८.३० वाजता कर्करोगानं निधन झालं. ते ५४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी उमा आणि मुलगा ऋषभ असा परिवार आहे.

सीताराम पांचाल गेल्या चार वर्षापासून किडनी आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी होते. कर्करोग बळावल्याने ते गेल्या दहा महिन्यांपासून अंथरूणाला खिळून होते. आजारपणामुळे त्यांचे वजन प्रचंड घटून ३० किलो झाले होते. त्यांना आजारपणातून बाहेर काढण्यासाठी अभिनेता इरफान खान, संजय मिश्रा, रोहिताश गौड आणि राकेश पासवान यांनी आर्थिक मदतीचा हात दिला होता. पण आजाराचा वाढता खर्च आणि प्रचंड आर्थिक चणचण यामुळे पांचाल यांनी सोशल मीडियावरून एका पोस्टद्वारे आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. दिग्दर्शक अश्विनी चौधरी यांनीही त्यांना आर्थिक मदत देण्याचं आवाहन टि्वटरवरून केलं होतं.