अभाविप म्हापसातर्फे लसीकरण विषयी जनजागृती

0
283
गोवा खबर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोव्याच्या म्हापसा शाखेने म्हापसा येथील वंचित व निराधार लोकांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना करोना लसीकरणाची माहिती दिली. तसेच तेथील समाजात असलेल्या कोरोना लसी विषयी शंकांचं निरसन केलं.
या सोबतच म्हापसातील इतर परिसरात आणि थिवि येथील धनगरवाडा या भागात कारोना लसीकरण या विषयी जनजागृती करण्यात आली. या मोहिमेदरम्यान अभाविप उत्तर गोवा सहसंयोजक अवधूत कोटकर, अभाविप म्हापसा शहर शाखा मंत्री सुदिप नाईक, अभाविप म्हापसा शहर शाखा सहमंत्री सहिल महाजन, अभाविप म्हापसा शहर कार्यकरणी सदस्य आकाश नाईक व सोनिया वेंगुर्लेकर यांनी ही जनजागृती केली.
संपूर्ण गोवा राज्यात ” रिचींग द अनरीच” ही मोहीम अभाविप गोवा राबवत आहे.