अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध

0
1792

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘अफगाणिस्तानात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. अफगाणिस्तानच्या बहु-सांस्कृतिक रचनेवरील हा हल्ला आहे. पीडीत कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना व्यक्त करतो. या दु:खद प्रसंगी अफगाणिस्तान सरकारला मदत करण्यासाठी भारत तयार आहे.’

अफगाणिस्तानच्या नांगरहार राज्याची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये शीख अल्पसंख्याकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या आत्मघातकी हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्यानं 20 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात स्थानिक शीख आणि हिंदू अल्पसंख्याक समुदायातील 17 जणांचा समावेश आहे.

मृतांमध्ये शीख समुदायातील प्रमुख राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या जास्त करून शीख अल्पसंख्याक समुदायातील आहेत. तर काबूलस्थित भारतीय दूतावासानं 10 शीख अल्पसंख्याकांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.