अपोलो टायर्सची शुभारंभ आवृत्ती #BadRoadBuddiesची गोवा येथे सांगता  

0
1404

 

  एसयुव्ही/4X4 कम्युनीटीच्या संपर्कात राहण्यासाठी आणि उभारणीकरिता उपक्रम

गोवा खबर:शुभारंभाची आवृत्ती असलेला #BadRoadBuddies हा एक ऑफ-रोडिंग इवेंट आहे, जो अग्रगण्य टायर निर्माते अपोलो टायर्स यांनी आयोजित केला आहे. आज गोव्यातील केपे येथे या कार्यक्रमाची शानदार सांगता झाली. ही साधारण 50 ऑफ-रोडर्सची कम्युनिटी असून त्यात भारताच्या निरनिराळ्या भागांतील, सोशल मीडियावर स्वत:चा दबदबा असणारे तसेच पत्रकारांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाला अपोलो टायर्स ब्रँड अँम्बेसेडर सचिन तेंडुलकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अपोलो टायर्स लिमिटेडचे अध्यक्ष ओंकार एस कंवर आणि एमडी तसेच उपाध्यक्ष नीरज कंवर यांच्यासोबत सचिन तेंडुलकर विविध ट्रॅक्सवर क्विक ऑफ-रोडिंगकरिता गेले.

 

कोणत्याही टायर निर्मितीदार कंपनीकरिता हा अशाप्रकारचा पहिला कार्यक्रम होता, एसयुव्ही मालक/चालकांची संख्या वेगाने वाढत असल्याने अपोलो टायर्सचे उद्दिष्ट्य हे #BadRoadBuddies उभारण्याचे आहे. शुभारंभाची आवृत्ती दोनच दिवसांत सर्वदूर गेली. गोवा ते दंडेली प्रवासाकरिता साधारण 100 वाहनांमध्ये अपोलो टायर्स बसविण्यात आले. परतीच्या प्रवासात काही नैसर्गिक तर काही मनुष्यनिर्मित ऑफ-रोड ट्रॅक्सवरून प्रवास संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सांगता समारोहाला संध्याकाळी ‘परिक्रमा या रॉक अँड रोल बँडने लाईव्ह सादरीकरण पेश केले.

यावेळी बोलताना अपोलो टायर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नीरज कंवर म्हणाले की, “आम्हाला होतकरू ऑफ-रोडर्स (नेहमीपेक्षा वेगळे, बऱ्याचदा खडबडीत)आणि इच्छुकांकरिता ते एकत्र यावेत यादृष्टीने एक मंच निर्माण करायचा आहे. ज्यामुळे भारताचा मोठा दुर्लक्षित प्रदेश धुंडाळता येईल. #BadRoadBuddies हा एक उपक्रम आहे, जो अपोलो टायर्सद्वारे इच्छुकांसाठी तयार करण्यात आला. आम्ही #BadRoadBuddiesच्या पहिल्या आवृत्तीसाठी फारच उत्सुक आहोत. यामुळे ऑफ-रोडर्स अनुभवाकरिता अपोलो  टायर्स सज्ज आहेत. हे टायर्स विशेष करून खडतर रस्त्यांवर सुलभ मार्गक्रमणा करता यावी म्हणून तयार करण्यात आले आहेत. जेणेकरून प्रवास रोमांचकारी होतो.

 

ज्यांच्या वाहनांत अपोलो  टायर्स बसविण्यात आले, असे सहभागीदारही याठिकाणी उपस्थित होते.  टायर्स खासकरून खडतर रस्त्यांवरील शांत आणि आरामदायक प्रवासासाठी तयार करण्यात आले आहेत. या टायर्सचे सेवा-आयुष्य दीर्घकालीन आहे. ते उच्च वेग व ब्रेकिंग दरम्यान सर्वोत्तम सुरक्षा प्रदान करतात. #BadRoadBuddies या उपक्रमादरम्यान आव्हानात्मक प्रदेशांत साहस इच्छुकांना आपापल्या वाहनांतून बेजोड आणि शब्दांत मांडता न येणारा मोटरींगचा अनुभव घेण्याची मोठी संधी घेता आली.

 

#BadRoadBuddies विषयी

#BadRoadBuddies ही होतकरू ऑफ-रोडर्सकरिता एक कम्युनिटी आहे. ज्यामध्ये भारताच्या विस्तीर्ण पसरलेल्या खडबडीत, कधीही न अनुभवलेल्या रस्त्यांचा शोध घेत सौंदर्य अनुभवण्याची एकत्रित संधी मिळते. या कम्युनिटीशी संबंधित लोकांना देशाच्या खडतर भागांत जाण्याची इच्छा असते. हे फारसे लक्षात न घेतलेले दुर्गम भाग असून ज्याठिकाणी जाऊन मनोहारी दृश्यांचा अनुभव घेता येतो. याठिकाणी केवळ नयनरम्यता महत्त्वाची नसून हे ऑफ-रोडींग अनुभव त्यांना आठवणी देणारे, निसर्गाच्या जवळ नेणारे व आयुष्यभर सांगता येतील अशा स्मृतींचे गाठोडे देणारे ठरते! रस्ता कितीही खराब असू दे, तुमचा सोबती असल्यावर सर्वकाही सुसह्य होते! ऑफ-रोडर्स कम्युनिटीत देशाच्या विविध भागांतून लोक सामील झाले आहेत, त्यांना ऑफ-रोडींगविषयी प्रेम आहे, जे आणखी थोडे अंतर कापण्यास तयार असतात!