अपघात प्रकरणी प्रतीक बब्बर विरोधात गोव्यात गुन्हा दाखल

0
1223
गोवा खबर:बॉलीवुड अभिनेता प्रतीक बब्बर याच्या विरोधात काल रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अपघातास कारणीभूत असलेली कार पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरु आहे.

प्रतीक बब्बर हा आपल्या कारने जात असताना उत्तर गोव्यातील पणजी-म्हापसा महामार्गावर एका स्थानिक युवकाच्या दुचाकीशी त्याची धडक बसली.त्या युवकाने तक्रार दाखल केल्या नंतर प्रतीक विरोधात पर्वरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. युवकाने प्रतीक विरोधात धमकावण्याची देखील तक्रार केली आहे.
स्थानिक तरुण पाओलो कोरिया याने प्रतीकविरोधात पोलिसात रफ ड्रायव्हींगची तक्रार दाखल केली. रफ ड्रायव्हींग दरम्यान प्रतीकने आपल्या स्कुटरला धडक दिली आणि मला व माझ्या बहिणीला धमकी दिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच प्रतीक यावेळी वन वे वरून आपली मोटार चालवत असल्याचा आरोप फिर्यादीने केली आहे. या तक्रारीनंतर प्रतीक बब्बरविरोधात पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
दरम्यान प्रतीकने देखील त्या युवका विरोधात परस्पर विरोधी तक्रार नोंदवली आहे.त्यात त्या युवकाने आपल्या कारची काच फोडल्याचा उल्लेख केला आहे.रात्री उशिरा जेव्हा प्रतीकला म्हापसा येथील आझीलो हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने आपला रक्त नमूना तपासणीसाठी देण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.