अपंगासाठी पणजी येथे पार्किंगची व्यवस्था

0
615

 गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाव्दारे तिसवाडी तालुक्यातील पणजी महानगर पालिकेच्या हद्दीत अपंगासाठी पार्किंगचे आदेश दिले आहेत.

एमजी रोड मिलरॉक नेवरेकर प्राईडसमोर आणि टी. बी. कुन्हा मार्ग, आझाद मैदानालगत एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था तसेच रूआ इस्माईल ग्रासीएस मार्ग विध्युतभवनसमोर एक दुचाकी वाहनासाठी, रूआ इस्माईल ग्रासीएस मार्ग मिनेझिस ब्रागांजा सभागृहाजवळ एक चारचाकी वाहनासाठी तसेच पासपोर्ट भवन (ईडीसी प्लाझा पाटो) येथे एक चारचाकी वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

जेएमएफसी कोर्ट/उपनिबंधक कार्यालयाजवळ (ईडीसी प्लाझा पाटो) एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहनासाठी आणि जुआंव कास्ट्रो रस्ता सत्र न्यायालयाजवळ एक चारचाकी वाहनासाठी, जुआंव कास्ट्रो रस्ता लेखा संचालनालयाजवळ एक दुचाकी वाहनासाठी त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या संकुलात एक चारचाकी वाहनासाठी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.