अन्न व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र आणि परवाना आवश्यक

0
59

गोवा खबर : अन्न व औषध प्रशासन खात्याने माहिती दिली आहे की स्थानिक वृत्तपत्रातील बातम्या आणि अनेक तक्रारींच्या आधारे बर्‍याच खासगी कार,आणि टॅक्सींचे मोबाईल दुकानात रूपांतरण करून भाजीपाला, फळे, मासे, चिकन, बेकरी पदार्थ, फास्ट फूड आणि अन्य अनेक खाण्याच्या वस्तू संचालनालयाकडून परवाना/ नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय पार्किंगच्या ठिकाणी तसेच रस्त्याच्या कडेला योग्य अन्न व सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम न पाळता विकल्या जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्यास हानी पोचू शकते. तसेच अन्न सुरक्षा आणि प्रमाणित कायदा 2006 अन्वये नोंदणी प्रमाणपत्र/ परवाना न घेता फास्ट फूड, टिफीन, बेकरी पदार्थ पुरवठा करणार्‍या घरगुती खाद्य व्यावसायिक जे घरबसल्या सोशल मीडियाद्वारे वस्तूंची मार्केटिंग करतात अशा लोकांवर विशेष लक्ष देण्यात आहे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे खाद्यान्न व्यावसायिक जे रस्त्याच्या कडेला खाद्य पदार्थ, फूड कार्ट व्हॅन, आणि घरगुती खाद्य व्यावसायिक नोंदणी प्रमाणपत्र/ परवान्याशिवाय खाद्य विक्री करत आहेत अशांनी अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अन्वये नोंदणी प्रमाणपत्र आणि परवाना प्राप्त केल्यानंतर आणि अन्न सुरक्षा आणि प्रमाणित कायदा 2006 च्या अनुसूची 4 अंतर्गत ठरविलेल्या स्वच्छताविषयक आणि आरोग्य विषयक नियमांचे पालन करत खाद्य व्यवसाय सुरू करावा अशी विनंती करण्यात आली आहे. म्हणून, कोणत्याही खाद्यपदार्थ सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र/ परवान्याशिवाय कोणतेही विक्रेते आपला खाद्य व्यवसाय चालवू शकणार नाहीत.

ग्राहकांनी जागरूक राहून एफएसएसएआय परवाना/ खाद्य व्यावसायिकांची नोंदणी क्रमांक तपासून पहावा, संशयास्पद व्यावसायिक आढळल्यास तक्रार दाखल करावी.

सर्व खाद्य व्यावसायिकांनी वर उल्लेख केलेला परवाना प्राप्त करण्यासाठी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.