अधिवेशन कालावधीत जमावबंदीचा आदेश

0
554

गोवा खबर:विधानसभा अधिवेशन काळात पर्वरी येथील विधानसभा संकुलातील परिसर, पर्वरी व पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ७ जानेवारी ते अधिवेशन संपेपर्यंत जमावबंदीचा आदेश उत्तर गोवा जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिला आहे.

जास्त संख्येने नागरिकांनी एकत्र येण्यास तसेच मोर्चा, धरणे, मिरवणुका काढणे व बैठका घेणे यावर बंदी असेल असा आदेश जारी केला आहे आणि ज्याना एकत्र येण्यास व मिरवणुका, धरणे, बैठका घेण्याची आवश्यकता आहे त्यांनी यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांची पूर्व परवानगी घेणे आवश्यकता आहे.