अधिवक्त्यांनी न्यायक्षेत्रातील फिदाईन बनून हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करावेत :जैन

0
1031

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन अंतर्गत राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशन

 

     रामनाथी :– वर्ष 1947 मध्ये फाळणी झाल्यावर देश स्वतंत्र झालात्यानंतर वर्ष 1950 मध्ये संविधान अंमलात आणले गेलेत्या वेळी सर्वांना समान न्याय मिळेलअसे सांगितले गेलेत्यामुळे सर्व अत्याचार विसरून हिंदूंनी ते स्वीकारण्याची सिद्धता दर्शवलीमात्र प्रत्यक्षात निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना सुविधा देऊन हिंदूंचे दमन केले जात आहेआज मुसलमान त्यांच्या धर्मासाठी फिदाईन होऊन वेळप्रसंगी स्वतःचा जीव देण्यास सिद्ध होतातअसे असतांना आपण हिंदु अधिवक्त्यांनीही कायद्याचा अभ्यास करून,न्यायालयात फिदाईन बनून हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी निःस्वार्थ वृत्तीने जीवापाड प्रयत्न करायला हवेतदेशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत असून ते रोखणे आवश्यक आहेया पार्श्‍वभूमीवर धर्मांतरविरोधी कायदा होण्यासाठी अधिवक्त्यांनी प्रयत्न करावा.आपले भविष्य सुरक्षित करायचे असेलतर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेतअसे प्रतिपादन लक्ष्मणपुरी (लखनौयेथील हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी केलेते येथील श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात आयोजिलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.

 सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन अंतर्गत चालू असलेल्या अधिवक्त्यांच्या या अधिवेशनात अधिवक्ता हरि शंकर जैनकेरळ येथील अधिवक्ता गोविंद केभरतन्इंडिया विथ विझडम ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठीहिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलेया वेळी 80 हून अधिक धर्मप्रेमी अधिवक्ता उपस्थित होतेया अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठी उपायहिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची आगामी दिशा अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात येईल.

अधिवक्त्यांनी प्रवाहाची दिशा पालटून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची व्यवस्था निर्माण करावी ! – चारुदत्त पिंगळे

     अधिवक्त्यांचा इतिहास हा पुरातन आणि आध्यात्मिक आहेलोकमान्य टिळकपंडित मदनमोहन मालवीयस्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक अधिवक्त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेऊन एक आदर्श निर्माण केलातोच आदर्श घेऊन धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतल्यास इतिहासात त्याची सुवर्णाक्षरात नोंद होईलयेथे जमलेल्या अधिवक्त्यांनी केवळ प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे अपेक्षित नसूनप्रवाहाची दिशा पालटून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची व्यवस्था निर्माण करायला हवीअसे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक  चारुदत्त पिंगळे यांनी केलेया वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक  सुनील घनवट यांनी सांगितले कीहिंदुत्वनिष्ठांना कायद्याची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांना हिंदुत्वाचे कार्य करतांना वेळोवेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेअशा वेळी हिंदुत्वनिष्ठांना धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करून साहाय्य करावे.

      अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आलादीपप्रज्वलनानंतर सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी वेदमंत्राचे पठण केले.हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान  डॉजयंत आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन समितीचे पूर्व भारत मार्गदर्शकनीलेश सिंगबाळ यांनी केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे  सुमित सागवेकर यांनी केले.