उष्माघाताच्या प्रतिबंधासाठीअतिश्रमाची कामे टाळा

0
422

उष्णतेच्या काळात घेण्यात यावयाचे प्रतिबंधात्मक उपाय

गोवा खबर: हल्लीच्या वर्षात अनेक राज्यांना उच्च तापमानाला तोंड द्यावे लागले असून उष्णता वाढण्याची शक्यता असल्यास उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघाताचा जरी संपूर्ण जनसंख्येला धोका असला तरी त्याचा वृध्द आणि बालकांना अधिक धोका संभवतो. त्यामुळे उष्माघातासाठी योग्य व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाय हाती घेणे महत्वपूर्ण आणि गरजेचे आहे. त्यासाठी लोकांनी योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले पाहिजे.

एप्रिल ते जुलै महिन्यात उष्माघात उद्भवतो. शरीराचे तापमान १०४ डिग्रीवर जाणे हे उष्माघाताचे मुख्य लक्षण आहे. डोके दुखी, चक्कर येणे, उष्णता असतानाही घाम न येणे, त्वचा लाल व कोरडी होणे, स्नायु कमकुवत बनणे किंवा पेटके येणे मळमळ आणि उलटी होणे इत्यादी उष्णतेची लक्षणे आहेत.

गोव्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने गोमंतकीय जनतेने जागृत राहून उष्णतेवर मात करावी.

नवजात अर्भकांची काळजी घेणे, ज्येष्ठ नागरिक, सतत उन्हात काम करणारे कामगार यांनी स्वताला जपणे आवश्यक आहे.

लोकांनी हवेशीर व हलक्या रंगाचे कपडे वापरणे आवश्यक आहे. घरातील वातावरण हवेशीर ठेवणे, अतिश्रमाची कामे टाळावीत. भरपूर पाणी किंवा जूस पिणे, मध्यप्राशन वर्ज्य करणे, थंड ठिकाणी मुलांना ठेवणे आणि उन्हात जाणे टाळाणे आवश्यक आहे. मुलांना बाहेर खेळायला जाऊ देऊ नये. ६ महिन्यावरील मुलांना ज्याना पुरक आहार सुरू केला आहे त्यांना आहारा दरम्यान थोड्याप्रमाणात थंड, व उकडलेले पाणी द्यावे.