अडकलेल्या स्थलांतरीतांच्या नोंदणीसाठी 16 जून पर्यंत मुदतवाढ

0
207

गोवा खबर:गोवा राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत ज्यांना आपल्या गावी परत जाण्याची इच्छा आहे त्यांची नावे नोंदविण्यासाठी सरकारतर्फे आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थलांतरित आपली नावे स्थानिक पंचायत आणि शहरी स्थानिक संस्था कार्यालयांमध्ये 16 जून 2020 पर्यंत नोंदवू शकतात. आतापर्यंत नोंदणी करू न शकलेले स्थलांतरीत जे आपल्या घरी जाण्यास इच्छुक आहेत त्यांना आणखी एक संधी देण्यासाठी गोवा सरकारने नोंदणी प्रक्रिया आणखी दोन दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थलांतरित आपली नावे स्थानिक पंचायत व शहरी स्थानिक संस्था कार्यालयात विहित अर्जाद्वारे नोंदवू शकतात. हा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी goa.gov.in वर सुध्दा उपलब्ध आहे.