अटक केलेल्या हिंदुत्ववाद्यांना सनातनचे साधक असल्याचे घोषित  करून सनातनवर बंदीचा हिंदूविरोधकांचा डाव !

0
1373
सनातन संस्थेचे कार्य अध्यात्मप्रसाराचे, हिंसाचाराचे नव्हे !
 
    गोवा खबर: महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून मागील काही दिवसांमध्ये काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटक झालीहे सर्व जण सनातनचे साधक असल्याचा दुष्प्रचार काही पुरोगामी व्यक्तीसंघटनातसेच काँग्रेसादी पक्षांचे राजकीय नेते जाणीवपूर्वक करत आहेतया संदर्भात वेळोवेळी सनातन संस्थेने आपली भूमिका स्पष्ट केली होती.अटक झालेल्यांपैकी एकही जण सनातनचा साधक नाहीयातील कळसकरअंदुरेसुरळे बंधू आणि रेगे ही पाच नावे तर आम्ही प्रथमच ऐकली आहेतत्यामुळे त्यांचा सनातनशी संबंध कोणीही जोडू नयेसनातन संस्था ही समाजात संविधानिक मार्गाने अध्यात्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था असूनसनातनची कोणतीही शिकवण हिंसाचाराच्या दिशेने नाही.अशी भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते  चेतन राजहंस यांनी मुंबईतील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित सनातन संस्थेच्या पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक  सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक  सागर चोपदार हे उपस्थित होते.

अटक झालेल्यांपैकी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदुसंघटनाच्या विविध उपक्रमांमध्ये स्थानिक स्तरावर सहभागी होत असले तरीत्यांचे स्वतःचे विविध संघटनांच्या माध्यमातून कार्य चालू होते.त्यामुळे त्यांना अटक केल्याने सनातनवर बंदी घाला वा सनातनच्या प्रमुखांना अटक करा असे म्हणणेम्हणजे काँग्रेसचे समर्थन करणार्‍या पक्षाच्या नेत्याला अटक झाल्यावर काँग्रेसवर बंदी घाला वा राहुल गांधींना अटक कराअसे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहेयात अध्यात्मप्रसार करणार्‍या लहानशा सनातन संस्थेला सर्व पुरोगामी नेते लक्ष्य करत असले तरी, त्यांचा खरा उद्देश हा आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हिंदु आतंकवादाच्या नावे भाजप सरकारला बदनाम करण्याचा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

        सनातन संस्थेवर केले जाणारे सर्व आरोप हे एटीएस् आणि सीबीआय या तपाससंस्थांकडून अनधिकृतपणे मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हणजेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून केले जात आहेतप्रत्यक्षात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते कीया प्रकरणी कुठल्याही विशिष्ट संघटनेचे नाव घेतलेले नाहीपोलीस तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेआम्हाला प्रश्‍न पडला आहे कीमग या सर्व बातम्यांच्या मागे असा कोणता सोर्स आहे ?यातील एकाही यंत्रणेने अधिकृतपणे सनातनचा संबंध असल्याचे सांगितलेले नसतांना सनातनची होत असलेली मानहानी ही फार वेदनादायी आहेयामुळे सनातनचे हजारो साधकलाखो हितचिंतक यांचीही समाजात मानहानी होत असल्याचे लक्षात घेऊन बातम्या द्याव्यातअशी विनंती आहेतसेच ही मानहानी रोखण्यासाठी नाईलाजास्तव सनातन संस्थेने या अनधिकृत माहितीच्या आधारे केल्या जाणार्‍या खोट्या आरोपांच्या संदर्भात न्यायालयीन खटले दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

     आजवर गेली 27 वर्षे अव्याहतपणे चालू असलेले तेजस्वी धर्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था म्हणून सनातन संस्था उदयास आली आहेअल्पावधीत मिळालेला जनाधार आणि कार्याचा विस्तार ही आम्हाला मिळालेली पोचपावतीच आहेआजवर कोणताही उपक्रम परवानगीविना घेतलाकोणत्याही कार्यक्रमात गोंधळ उडालाकायदा सुव्यवस्थेला गालबोट लागलेअसे कधीही झालेले नाही. आजपर्यंत सनातन संस्थेच्या विरोधात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. याचे कारण आम्ही संविधानिक मार्गलोकशाही मूल्येन्यायव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था यांचा केवळ मान राखतो म्हणून नाहीतर त्यानुसार आचरणही करतोअशा एका आध्यात्मिक संस्थेला इतक्या गंभीर प्रकरणांत विनापुरावा जबाबदार धरणेहे आश्‍चर्यकारक आहेहा आमच्यावरील अन्याय आहेहा अन्याय थांबवावाअशी विनंती यावेळी करण्यात आली .

     आजवरच्या एकाही प्रकरणाच्या (ठाणे स्फोटमडगाव स्फोटचारही हत्या प्रकरणेआरोपपत्रांत कुठेही सनातन संस्थेचे नाव नाहीसनातन संस्था आरोपी असल्याचे कुठेही म्हटलेले नाहीसनातन संस्थेने देशविघातक कृत्य केलेअसा कुठेही उल्लेख नाहीअसे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणेहे खोडसाळ आणि तथ्यहीन आहे,असा दावा यावेळी करण्यात आला.

       आतंकवादविरोधी पथक न्यायालयात या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या उद्देशाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागते आणि इकडे बाहेर तपास होण्यापूर्वीच मराठा आंदोलनात स्फोट करण्याचा कट, ‘बकरी र्इद’ला घातपाताचा कट, 500 प्रशिक्षित कार्यकर्त्यांची सेना इत्यादी आरोप केले जातातते सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वत्र पसरवले जातात,हे सर्व राजकीय षड्यंत्र आहेया प्रकरणी प्रसारित केल्या जाणार्‍या जातीवाचक संदेशांची चौकशीही शासनाने करून त्यामागे नेमके कोण आहेहे शोधले पाहिजे,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    हिंदुत्ववादी शासन सत्तेत असल्याने हिंदुत्वाला बदनाम करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा आणि सनातनसारख्या निष्पाप संस्थेला संपवण्याचा हा प्रकार आहेकुत्र्याला पिसाळलेले म्हणा आणि ठार मारा हे या धर्मविरोधकांचे षड्यंत्र आहे.त्यामुळे सूज्ञ पत्रकारांनी या षड्यंत्राला बळी पडू नयेअशी आमची विनंती आहेअसे असले तरी सनातन संस्था करत असलेले धर्मप्रसाराचे कार्य आम्ही अधिक जोमानेगतीने आणि शक्तीने करण्याचा प्रयत्न करूतसेच सनातन संस्थेवर लादण्यात येत असलेली अघोषित बंदी आम्ही कदापि सफल होऊ देणार नाहीअसा आम्ही निर्धार केला आहेअशी भूमिका  राजहंस यांनी  मांडली

हिंदु जनजागृती समितीचे हिंदूसंघटनाचे कार्य रोखण्यासाठी षड्यंत्र !

    हिंदु जनजागृती समिती ही समाजात धर्मशिक्षण देऊन हिंदूसंघटनाचे कार्य करतेयामुळे विविध विचारसरणीकार्यपद्धती असणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून केले जात आहेयामुळे देशभरातील संघटना जोडल्या जात आहेतहिंदूंचे प्रभावी संघटन उभे राहून आज हिंदूंवरील अन्यायांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे रहात आहेयामुळे हिंदूविरोधी शक्ती हे कार्य बंद पाडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला लक्ष्य करत आहेतमात्र समितीचे हिंदूसंघटनाचे कार्य हिंदु समाज प्रत्यक्ष पहात असून अशा षड्यंत्राला तो बळी पडणार नाहीअशी आमची खात्री आहेअसे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक  सुनील घनवट यांनी या वेळी सांगितले.