अझिट डो रिनो प्रिमिअम पोर्तुगीज ऑलिव्ह ऑइल गोव्यात उपलब्ध

0
1038

पणजी : पोर्तुगीज देशात बनलेले अझिट डो रिनो हे प्रिमिअम ऑलिव्ह ऑइलचे उत्पादन वास्को दि गावा येथील कारोमा एजन्सीज द्वारे गोव्यात उपलब्ध करण्यात आले आहे. २०१६ मध्ये कारोमा एजन्सीसजने हे प्रिमिअम पोर्तुगीज ऑलिव्ह ऑइल आयात केले होते आणि त्यानंतर आणखी दोन वेळा या तेलाची आयात करण्यात आली. सध्या गोव्यासह मुंबईमध्ये अझिट डो रिनो हे ऑलिव्ह तेल उपलब्ध असून लवकरच देशभरातील इतर शहरांमध्येही ते उपलब्ध केले जाणार आहे. या उत्पादनाच्य अनावरणप्रसंगी कारोमा एजन्सीजचे संचालक श्री. कार्मेलिनो डा रोशा माछाडो आणि गोव्यातील एकमेव वितरक असलेल्या गोवन हॉस्पिटॅलिटीचे श्री. कार्लुस नोरोना उपस्थित होते.
हे ऑलिव्ह ऑइल उत्पादन तीन श्रेणींमध्ये उपलब्ध आहे : (१) एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल, (२) वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि (३) ऑलिव्ह ऑईल. कोल्ड प्रेस्ड प्रकारे व यांत्रिकी पद्धतीने कोणतेही इतर रासायनिक घटकांचा अवलंब न करता हे ऑलिव्ह ऑइल गाळले जाते. एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल या दोन श्रेणींची वर उल्लेख केल्याप्रमाणे आयात केली जाते. या सर्व जाती प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी योग्य असून मानवी सेवनासाठी त्यांची शिफारस केली जात नाही.
आम्लांचे प्रमाण ०.८% पेक्षा कमी असलेले अझिट डो रिनो एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल हे सर्वोत्तम दर्जाचे ऑलिव्ह तेल मानले जाते. खरे म्हणजे अझिट डो रिनो एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइलची आम्लता केवळ ०.३% टक्के असल्याने ते उच्च दर्जाचे उत्पादन ठरते. उत्तम स्वाद, चव असलेले तसेच आरोग्यवर्धक असलेले हे तेल कोशिंबीर, मासा, भाजलेले पदार्थ यांच्यावर टॉपिंग म्हणून तसेच चटण्या-सॉसद्वारे सेवन केले जाते.
अझिट डो रिनो ऑलिव्ह ऑइल म्हणजे रिफाइन्ड ऑलिव्ह तेल आणि एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल यांचे मिश्रण असते. विविध पदार्थ तळणे, भाजणे यासाठी हे तेल उपयुक्त ठरते. कोणतेही रासायनिक घटक न मिसळता, नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले हे तेल असल्याने ते आरोग्यवर्धक खाद्यतेल म्हणून गणले जाते.
पोर्तुगीजचे ऑलिव्ह तेल हे जगातील सर्वोत्तम ऑलिव्ह तेल गणले जाते आणि नेहमीच या तेलाला ‘छुपा हिरा (हिडन जेम)’ असेही संबोधले जाते. ऑलिव्ह तेलाच्या दर्जाचा पोर्तुगीजला मोठा अभिमान असून शेजारील देशांप्रमाणे तेलाच्या दर्जात तडजोड पोर्तुगीजने कधी केली नाही. स्पेन आणि इटली देशांमध्ये झालेल्या तपसाण्यांमध्ये त्या देशांत मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह तेलात भेसळ होत असल्याचे उघड झाले होते.
चांगल्या दर्जाच्या एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाचे आरोग्य परिणाम अतुलनीय असे असून संशोधनातून दैनंदिन पातळीवर या तेलाच्या सेवनाचे लाभ होत असल्याचे सिद्ध झाले आहे. केवळ ऑलिव्ह तेलाचा आहारात समावेश केल्याने आणि चांगल्या दर्जाच्या एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह तेलाच्या अवलंबाने हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह आदी समस्यांना दूर ठेवणे आणि हृदय निरोगी राखणे शक्य होत असल्याचा निष्कर्ष अनेक अभ्यासांमधून समोर आला आहे. तसेच त्वचा आणि स्तनाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी त्यावर उपचारांसाठीही हे तेल उपयोगी असल्याचे समोर आले आहे. ऑस्टियोपोरोसिस, स्मृतिभ्रंश (अल्झमायर्स) व पार्किनसन्स, औदासिन्य आदी व्याधींविरोधातही हे तेल गुणकार आहे. तसेच अनेक आजार, व्याधींचे कारण असलेल्या मेटाबोलिक सिंड्रोंमपासूनही हे तेल शरीराचे रक्षण करते.

कोणत्याही रासायनिक घटकाचा वापर न करता यांत्रिकी पद्धतीने फळातून तेल गाळण्याचा प्रकार केवळ ऑलिव्ह तेलाबाबत केला जातो याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. तर धान्य, बिया, भाजीपाला, तेलबिया यांच्यापासून तेल गाळताना रसायनांचा विशेषतः हेक्झेनचा वापर केला जातो आणि या हेक्झेनमध्ये कॅन्सरला पोषक असे गुणधर्म असतात.
अझिट डो रिनो एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल चे उत्पादन कौटुंबिक मालकीच्या कंपनीद्वारे केले जाते. या कंपनीच्या मालकीच्या ऑलिव्ह बागा असून या व्यवसायात खूप काळापासून कार्यरत असलेल्या कुटुंबांपैकी हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाच्या ऑलिव्ह बागा प्रामुख्याने मध्य पोर्तुगालमधील ओरेम जिल्ह्यात फातिमापासून जवळच आहेत. या बागांमध्ये कोणतेही रसायन किंवा कृत्रिम खतांचा वापर केला जात नाही आणि या बागांना सेंद्रिय प्रमाणपत्र लाभलेले आहे. सर्वोत्तम दर्जा निश्चित करण्यासाठी या कंपनीचे स्वतःचे गोदाम, बॉटल फिलिंग प्रकल्प आणि पॅकेजिंग सुविधा आहेत. या कौटुंबिक कंपनीद्वारे ब्राझील, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंडसह अनेक आफ्रिकी देशांमध्ये ऑलिव्ह तेलाची निर्यात केली जाते. अशाच प्रिमिअम दर्जाचे आणि जगभर मागणी असलेले पोर्तुगीज ऑलिव्ह तेल गत वर्षीपासून गोवा राज्यातील निवडक दालनांच्या माध्यमातून उपलब्ध केले जात आहे.
“आरोग्याचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये तेल म्हणून केवळ एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल यांचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. तसेच एकाद्या वाहन व्यवस्थित चालत राहावे म्हणून आपण सर्वोत्तम व कार उत्पादकाने निर्देशित केलेले मान्यताप्राप्त तेलच वापरता आणि त्याची जागा इतर प्रकारचे तेल घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे या ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर करणे आवश्यक ठरते.”
अझिट डो रिनो एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल ५०० मिली आणि १ लिटरच्या काचेच्या बाटलीमध्ये तर अझिट डो रिनो ऑलिव्ह ऑइल १ लिटर काचेची बाटली व ३ लिटर पेट बॉटलमध्ये उपलब्ध आहे. या तेल उत्पादनांचे गोव्यातील अधिकृत वितरक गोवन हॉस्पिटॅलिटी हे असून पणजीतील टपाल कार्यालयाच्या मागे कारवेला होम स्टे येथे त्यांचे कार्यालय आहे.
या तेल उत्पादनांच्या अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज भेट द्या.- Do Reino
Health Benefits Link : https://www.oliveoiltimes.com/olive-oil-health-benefits
Olive Oil Fraud Link : https://www.oliveoiltimes.com/olive-oil-business/italy-arrests-33-accused-olive-oil-fraud/55364