अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या गरजांवर चर्चा करण्यासाठी बैठक संपन्न

0
143

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पर्वरी सचिवालयातील परिषद गृहात अग्नीशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली. बैठकीत खात्याच्या गरजासंबंधी आणि इतर पायाभूत प्रकल्पासंबंधी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यानी सदर खात्यातील रिकामी पदे लवकरात लवकर भरण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

वित्त खात्याचे प्रधान सचिव श्री पुनित कुमार गोंयल आयएएस, अग्नीशमन व आपत्कालीन सेवा खात्याचे संचालक श्री अशोक मेनन आणि वित्त खात्याचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

अग्नी सेवा संचालनालयाच्या विस्तारासंबंधी आणि आधुनिक यंत्रणांची तरतुद करणे अशा विषयांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. अग्नी सेवा संचालनालय ऑनलाईन एनओसी उपलब्ध करते. सदर संचालनालयाच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करण्याची शक्यता पडताळण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्र्यांनी खात्याच्या कार्याचा आणि आपडा योजनेच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी कुंकळीला लवकरच पूर्ण दर्जाचे फायर स्टेशन मिळणार असल्याची माहितीही दिली.