अग्निशमन दल, गृह रक्षक आणि नागरी संरक्षण विभागातल्या कर्मचाऱ्यांना 2019 या वर्षाचे राष्ट्रपती पदक घोषित

0
942

 

राज्य अग्निशमन सेवेतील अजित कामत आणि मार्वीन फेराओ यांना राष्ट्रपती पदक

 गोवा खबर:आपापल्या क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या 86 कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिवसानिमित्त राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे. अग्निशमन दलातल्या 15कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य सेवा पदकाने गौरवण्यात येईल तर, 14 कर्मचाऱ्यांना शौर्य सेवा पदकाने गौरवण्यात येईल. अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या7 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, तर विशेष कामगिरी करणाऱ्या 50 कर्मचाऱ्यांना अग्निशमन पदक जाहीर झाले आहे.

गोवा राज्य अग्निशमन सेवेतील सहाय्यक विभागीय अधिकारी अजित केशव कामत आणि मार्वीन बोस्को फेराओ यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करण्यात येणार आहे.  

पुरस्कार विजेत्यांची यादी 

http://164.100.117.97/WriteReadData/userfiles/fire%20service%20award%20press%20release%20.pdf